६ जानेवारी २०२३ पत्रकार दिनानिमित्त नातेपुते येथे विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला
उपसंपादक : साप्ताहिक बहुजन
भूषण वृत्तपत्र
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथे बाळशास्त्री
जांभेकर यांनी 6 जानेवारी १८३२ रोजी “दर्पण” हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू
केले तेव्हापासून देशभर पत्रकारिता दिन साजरा होत आहे. पत्रकार पत्रकारीतेतून अन्यायाला
वाचा फोडण्याचे पवित्र काम करतो, पत्रकारिता हे सामाजिक काम आहे. पत्रकार आपल्या लेखणीतून घडणार्या
विषयानुसार लेखणी करून जनतेला वाचायला देत असतात त्यामुळे नातेपुते येथील विविध संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी
पत्रकारांचा सन्मान केला. त्यामध्ये नातेपुते येथील मा.शिवसेना माळशिरस तालुका अध्यक्ष
राजकुमार हिवरकर-पाटील (बाळासाहेबांची शिवसेना), लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा-नातेपुते, मा.अक्षय भांड (राष्ट्रवादी
युवक संघटना, महाराष्ट्र राज्य सचिव, मा.संजय व्हेलेकर सामाजिक कार्यकर्ते, संस्थापक मा.डॉ.दत्तात्रय
निटवे सर ग्लोबल इंटरनेशनल स्कूल, मोरोची, ता.माळशिरस, शेखर राजू खिलारे, अकलूज, महाकिड्स स्कूलचे संस्थापक मा.श्री.शिवशंकर पांढरे, नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी
माधव खांडेकर इ.नी. पत्रकारांचा सन्मान केला.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी
संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र
राज्य
आठवले परिवार
टीप : जे दिसेल, जे
पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
.jpg)
Comments
Post a Comment