Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

६ जानेवारी पत्रकार दिन साजरा का करायचा. पत्रकारिता पूर्वीची आणि सध्याच्या काळातील याबाबत एक लेखाजोखा



          उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण

बाळशास्त्री जांभेकर यांनी सन १८३२ मध्ये “दर्पण” हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले म्हणून त्यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात. तसेच पहिले संपादक व पत्रकार म्हणून ओळखले जातात. तसेच त्यांनी १८४० मध्ये “दिग्दर्शन” मराठी मासिक सुरू केले. या मासिकाचा उद्देश विज्ञानाचा परिचय असा होता. त्यांनी विविध विषयावर पाठयपुस्तके तयार केली. बाळशास्त्री जांभेकर इतिहासाचे व्यासंग होते. शिलालेख व ताम्रपट इत्यादींचा अभ्यास करून ऐतिहासिक लेख लिहले. शोध निबंध यावरती सुद्धा लिखाण केले. त्यांना महाराष्ट्रातील “आद्य इतिहास संशोधन” म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रात पुरोगामी विचार सरणीचा पाया बाळशास्त्री जांभेकर यांनी घातला त्यामुळे त्यांना “आद्य समाजसुधारक”“सुधारणा वादाचे प्रवर्तक” म्हणून ओळखले जातात. 

        बाळ शास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी रोजी वृत्तपत्र चालू केले म्हणून हा दिवस “पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. पूर्वीची पत्रकारिता ही रोखठोक, सडेतोड, बिनधास्त, निर्भिड अशी होती. संपादक, पत्रकारांना घाबरत होती, पत्रकारांचा दरारा होता, जी घटना घडते त्यावरतीच पत्रकार लिखाण करून चांगले काय, वाईट काय याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवत असत. संपादक, पत्रकाराची भीती त्याकाळात होती, पत्रकारांच्या नादी कोणी लागत नव्हते. पत्रकार हा लोकशाहीचा “चौथा खांब” खर्‍याअर्थाने होता. त्यावेळचे पत्रकार यांची जनमाणसात दहशत होती त्यामुळे संपादक पत्रकारांना महत्व होते. त्यावेळचे संपादक काहीही झाले तरी वृत्तपत्र चालविण्यासाठी पदरमोड करून वृत्तपत्र चालवायचे, कोणावर विसंबून राहत नव्हते परंतु काळ बदलत गेला आणि संपादक, पत्रकार मवाळ झाले. सध्या पत्रकारिता करण्यासाठी असंख्य तरुण, शिक्षक पुढे आले आहेत. 

        सध्या पत्रकारितेला वाळवी लागली आहे. संपादक पत्रकार आपआपल्या परीने गुलाम झाले आहेत, लाचार झाले आहेत. सध्या अनेकांना वाटते की, पत्रकारिता म्हणजे पैसे कमविणे असेच वाटू लागले आहे. पत्रकारिता करणे काही बंधन नाही, सध्याच्या काळात पत्रकारिता मवाळच करावी लागत आहे. पत्रकारिता म्हणजे मान-सन्मान असे वाटू लागले आहे परंतु तसे नाही. पत्रकारांना काही मानधन नसते, मिळणार्‍या जाहिरातीच्या कमिशनवर घर प्रपंचा चालवायला लागत आहे. बोटावर मोजण्या इतपतच पत्रकार प्रामाणिक आहेत आणि त्यांचे नाव लौकिक आहे. 

        महाराष्ट्राच्या सध्याच्या काळात नवीन पत्रकार झालेले जे आहेत त्यांना पत्रकारिता म्हणजे मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे असे घमेंडीत वावरत आहेत व पैशासाठी ब्लॅकमेल करून रोजारोटीचा प्रश्न सोडवत आहेत. तसेच तोतया पत्रकार ही असंख्य पाहायला मिळत आहेत. सध्या दलाल चिरीमिरी घेवून पत्रकारिता करीत आहेत त्यांच्यामुळे पत्रकारितेला ग्रहण लागले आहे. पत्रकारांनी पत्रकारितेची वाट लावली आहे त्यामध्येही पत्रकार पत्रकाराचे दुश्मन झाले आहेत ते मी पाहत आहे. पत्रकारिता ही विस्तव आहे, वेळ आल्यावर चटके देते त्याची वेदना कायम राहते. मी शोध पत्रकारिता करीत आहे. विषय शोधून त्यावरती लिखाण करतो व जनतेपर्यंत पोहोचवतो. मी मवाळवादी व जहालवादी अशीच पत्रकारिता करतो, मी मोडेन पण वाकणार नाही अशी माझी मानसिकता झाली आहे. भित्रेपणा माझ्या रक्तात नाही, मी घायाळ होणार नाही, घायाळ करतो त्यामुळे पत्रकारांनी पत्रकारितेचा मान ठेवून पत्रकारिता करावी. पत्रकारितेला गालबोट लागेल असे करू नये. पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!   

जनहितार्थ

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

 


Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...