ग्रामपंचायतच्या मासिक मीटिंगला सर्व सामान्य ग्रामस्थांना बसता यावे यासाठी अनेक युवकांनी आपआपल्या परीने ग्रामविकास विभागाकडे पाठपुरावा केला होता त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिकारी यांनी आता ग्रामस्थांना मासिक मीटिंगला, सभांना बसण्याचा अधिकार आहे असे कळविले आहे. ग्रामपंचायत, सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आता कोणीही अडथळा करू शकणार नाहीत. याबाबत राज्यातील सर्व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आले आहे त्यामुळे हा आदेश राज्यातील सर्व ग्रामपंचायतना लागू झाला आहे. या मासिक मीटिंगला, सभेला यापुढे ग्रामस्थांना हजर राहण्याचा अधिकार आहे. सहभागातून यापुढे ग्रामपंचायतचा कारभार अधिक पारदर्शी व्हावा म्हणून यापूर्वीही राज्य शासनाने 19 सप्टेंबर 1978 रोजी शासकीय परिपत्रक काढले होते. परंतु या मासिक मीटिंगला, सभांना ग्रामस्थ यांनी हजर राहू नये या दृष्टीने ग्रामपंचायतने एकमताने ठराव करून सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक या व्यक्तिरिक्त इतर ग्रामस्थांना त्यामध्ये सहभाग घेवू नये यासाठी ग्रामपंचायतने ठराव केले होते. ग्रामस्थांना मासिक सभांना, मिटिंगला उपस्थित राहण्यासाठी विरोध दर्शविला होता परंतु काही राज्यातील युवकांनी सतत पाठपुरावा करून मुख्यकार्यकारी अधिकारी यांना "सळो की पळो" करून सोडले त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांच्याकडे मार्गदर्शन मागितले होते. त्यामुळे 1 मार्च रोजीच्या दिलेल्या पत्रात ग्रामपंचायतच्या सभेबाबत महाराष्ट्र शासन परिपत्रक पी.आर.सी. 1077/2703 सी.आर. (2732) दि.11/09/1978 व महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 (क्र.176) 2 खंड 7 मधील नियम 1, टीप-1 मधील ग्रामस्थांना हजर राहण्याबाबत आता तरतूद आहे. महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाचे कार्यासन अधिकारी सुहास जाधव यांनी कळविले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत मधील मासिक मिटिंगला व सभांना ग्रामस्थांना हजर राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक यांच्यावरती ग्रामस्थांचे लक्ष राहणार, नियंत्रण राहणार आहे. त्यांच्यावर वचक राहणार. यापुढे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांनी यापुढे मासिक मीटिंगला, सभेला उपस्थित राहण्यासाठी वार, वेळ, तारीख ग्रामस्थांना कळविण्यात यावी.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.