संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील नातेपुते
नगरपंचायतने नुकताच प्रसिद्ध केलेल्या प्रारूप विकास आराखडा नकाशातील गट नंबर मधील
रस्ता रुंदीकरण बाबत नकाशा संपादक अभिमन्यू आठवले यांच्या हाती लागला असून नकाशा
कोणाच्या सांगण्यावरून केला गेला? रस्त्याची रुंदी किती वाढवणार? नकाशा तयार करण्या अगोदर ज्या गट नंबर मधील रहिवासी यांना
का विश्वासात घेतले नाही, बोलावले का नाही? हा नकाशा ग्रामपंचायत काळातील आहे का? की सध्या नगरपंचायत काळातील आहे? हा ठराव करून वरील कार्यालयाकडे गट नंबर पाठविले होते का? ज्या जागा मालकांनी आप-आपल्या परीने गटार व पाण्याच्या पाईप
लाईनसाठी जागा सोडून घरे बांधली आहेत, पूर्वीपासून रस्ते आहेत त्याची
रुंदी वाढविण्याचे कारण काय? जेवढा आहे त्यानुसारच त्याचे
उत्कृष्ट काम केले पाहिजे.
पै-पै जमा करून, कर्ज काढून घरे बांधली गेली आहेत, ती पडणार का? त्याचा मोबदला किती देणार? किंवा त्या बदल्यात कुठे जागा देणार? का मनमानी, हुकूमशाही करून जागा मालकांना
नातेपुते नगरपंचायत मधील अधिकारी व पदाधिकारी बेघर करणार का? नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्ध केलेल्या व संपादकच्या हाती
लागलेल्या नकाशावरून जागा मालकांना चिंता वाटू लागली आहे.
मालकी हक्क असलेल्या व रहिवाशी
असलेल्या जागा मालकांना नातेपुते नगरपंचायत देशोधडीला लावणार का? नातेपुते येथील जागेचे भाव गगनाला भिडले आहेत, त्यामध्ये रस्ते रुंदीकरणाचा नकाशा प्रसिद्ध करून जागा
मालकांच्या घरादारावर नातेपुते नगरपंचायत नांगर फिरवणार का? नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्ध केलेला नकाशा, गट नंबर मधील रहिवाशीयांना चिंतेचा विषय झाला आहे, वाद होण्याची शक्यता वाटते.
तरी नातेपुते नगरपंचायतने प्रसिद्ध केलेला रस्ता रुंदीकरणाचा नकाशा तात्काळ रद्द करावा व जेवढा आहे तेवढा उत्कृष्ट करावा. रहिवाशी यांची घरे पाडून रस्ता करणे योग्य नाही, रहिवाशी यांचे हित पहावे, वार्ड क्रमांक ३ मधीलच रस्ता रुंदीकरण करणार कि नातेपुते येथील गल्ली बोळातील रस्ते ही एकाच मापाचे सर्वत्र रुंदीकरण करणार का? नातेपुते नगरपंचायत मधील अधिकारी व पदाधिकारी यांनी विचार करणे गरजेचे वाटते. नातेपुते नगरीमध्ये रस्त्याच्या रुंदीकरणावरून वाद होऊ नये, नातेपुते नगरी ही शांततेचे माहेर घर आहे त्यास गालबोट लागू देऊ नये, हिच अपेक्षा आहे.
तसेच सर्व ग्रामस्थांना विनंती आहे कि, रस्ता रुंदीकरण नकाशामध्ये जे गट नंबर आहेत त्यामधील मालक व प्लॉट धारक यांनी तात्काळ नातेपुते नगरपंचायतमध्ये जाऊन नकाशा पहावा व गट नंबर धारक व प्लॉट धारक यांनी तात्काळ आपले लेखी म्हणणे स्वरूपात नातेपुते नगरपंचायतमध्ये दयावे.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.