Skip to main content

Posts

Showing posts from January, 2022

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

कुबड्यावर आलेल्या महाराष्ट्र सरकारने अॅट्रॉसिटी अॅक्ट कायदा पांगळा करण्याचा कपटनिती डाव रचला आहे तो अन्यायकारक व चीड आणणारा आहे ते परिपत्रक त्वरित रद्द केले जावे

संपादक           या महाराष्ट्रावर एकमेकांच्या मदतीने , एकमेकांच्या आधाराने म्हणजे कुबड्या घेवून बसलेल्या जातिवादी महाराष्ट्र सरकारने १० जानेवारी २०२२ च्या शासन निर्णयाचे जे परिपत्रक काढले आहे ते रद्द करावे. “अॅट्रॉसिटी अॅक्ट” हा कायदा अनुसूचीत जाती जमातीचे रक्षण करणारा कायदा आहे. तो अन्याय होत असेल तरच लागू केला जातो. ज्या जातिवादी महाराष्ट्र सरकारने काढलेले जे परिपत्रक आहे ते अनुसूचीत जाती जमातीवरती अन्यायकारक ठरू शकते. अॅट्रॉसिटी अॅक्ट कायद्यातील गुन्ह्यातील तपास हा पोलिस आयुक्त , पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे असताना तो त्यांच्याकडून काढून घेवून पोलिस निरीक्षक (गट अ) व सहाय्यक पोलिस निरीक्षक (गट ब) यांच्याकडे करावा असे परिपत्रक सांगत आहे. हे परिपत्रक बेकायदेशीर असून हा कायदा कमकुवत व पांगळा व दुबळा करण्याचा या जातिवादी महाराष्ट्र सरकारचा डाव आहे असे दिसून येत आहे परंतु हा डाव यशस्वी होणार नाही. जे परिपत्रक काढले आहे ते शासनाने रद्द करावे व पूर्वीप्रमाणेच जे तपास अधिकारी आहेत त्यांच्याकडेच तपासची जबाबदारी असावी. पोलिस निरीक्षक व सहाय्यक पो...

राजकारण म्हणजे “पैसा फेको तमाशा देखो” ही गंभीरबाब

संपादक           कोणत्याही क्षेत्रातील निवडणुका असु दया त्यासाठी निवडून येण्यासाठी पैसा महत्वाचा ठरू शकत आहे. पैशापुढे मतदार लाचार झाला आहे. आपल्या पवित्र मताची किंमत पैशात मोजली जाते. राजकारणाचा खरा “किंगमेकर” पैसा आहे. पैशापुढे कोणताही उमेदवार डॉक्टर , वकील , इंजिनीअर , कोणत्याही शाखेचा पदवीधर , उच्च विचार सरणीचा मनमिळावू , अभ्यासूवृत्तीचा उमेदवार रिंगणात उभे असतील तर त्यांना मतदार किंमत देत नाही. परंतु ७ वी शिक्षण असलेले , जनतेशी संबंध कधीही नसलेले उमेदवार पैशाच्या जोरावरती निवडून येतात ही गंभीर बाब आहे. “लोकशाही” कागदपत्रापुरती राहिली आहे. सध्या लोकशाहीच “चांगभलं” झाल आहे. लोकशाहीला आर्थिकशाही घातक ठरत आहे. यापुढे सर्वसामान्य , उच्चशिक्षित उमेदवार जनतेला चालतील असे वाटत नाही. घमेंड खोर , गुंड , पैसेवाला , तस्कर असेच लोक मतदार निवडून देणार कारण त्यांचा पैसा घेतला जातो. पैशापुढे मतदार राजा बेशरम , दुबळा झाला आहे. मतदान यंत्राला दोष देण्यात अर्थ नाही. दोषी मतदान यंत्र नाही तर मतदार हे दोषी आहेत. राजकारण म्हणजे घराणेशाहीसाठी “व...

महाराष्ट्रातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायतच्या निवडणुका व १९ जानेवारी २०२२ रोजी लागलेल्या निकालानंतर विजय झालेले सर्व उमेदवार व “झुंज” दिलेले उमेदवार व पॅनेल प्रमुखांचे अभिनंदन...!

संपादक नातेपुते नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१-२२ यामध्ये पार पडलेल्या निवडणुका व १९ जानेवारी २०२२ रोजी लागलेल्या निवडणुकीचा निकाल यामध्ये जे उमेदवार , बंधु-भगिनी विजयी झालेल्या आहेत त्यांचे अभिनंदन...! तसेच “झुंज” देणार्‍या उमेदवाराचे तसेच पॅनेल प्रमुखांचेही अभिनंदन...! तसेच माळशिरस व महाळूंग, श्रीपूर तसेच महाराष्ट्रातील नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या व निकालही लागले. त्यामध्ये सर्व विजयी व झुंज देणार्‍या उमेदवाराचे व पॅनेल प्रमुखांचे अभिनंदन...! यापुढे नगरपंचायतमध्ये “ नगरसेवक” म्हणून जात असताना विकास हाच ध्यास डोळ्यासमोर ठेवून मतभेद बाजूला सारून एकजुटीने गावाचा , प्रभागाचा , विकास करण्यासाठी कटिबद्ध राहावे. शासकीय निधीतून उत्कृष्ट विविध योजना राबवा. गोरगरिबाचे अतिक्रमणे करण्यासाठी ठराव करा . जे घरकुल योजनेपासून जे वंचित आहेत त्यांना आयुष्याचा आधार करा. त्यांच्यासाठी प्रकाशमय व्हा. कोणी मतदान केले , कोणी नाही असे मनात आणू नका. सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असे समजून काम करा. कोणत्याही मतदार बांधवांना कमी लेखू नका. जय-पराजय असतो त्याचा मोठ्या मनाने स्वीकार करा , राग येवू द...

घरादाराचा त्याग करून आयुष्यभर “ब्रम्हचारी” राहून “जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून जनतेचा सेवक समजून कर्तव्य बजावणारे संस्थापक राष्ट्रीय समाजपक्षाचे माजी कॅबिनेट मंत्री मा.महादेवरावजी जानकर साहेब

  मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य)  संपादक           राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक माजी कॅबिनेट मंत्री मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब यांनी घरदाराचा , रक्तातील कुटुंबाचा त्याग करून आयुष्यभर “ब्रम्हचारी” राहून भारत देशातील जनतेचा सेवक बनून “ जनसेवा हीच ईश्वर सेवा” समजून कर्तव्य बजावत आहेत. उन्हाळा , हिवाळा , पावसाळा या ऋतुचा सामना करून जनतेच्या हक्कासाठी , न्यायासाठी रात्रीचा दिवस करून कार्यकर्त्यात मिळून मिसळून राहत आहेत. साहेबांकडे मीपणा नाही. जनता आणि कार्यकर्ते हाच माझा परिवार समजून काम करीत आहेत. साहेबांनी मिळालेले आयुष्य हे जनतेसाठीच वाहिले आहे. घरादाराचा , रक्तातील नात्याचा विचार न करता घर सोडले , लग्न केले नाही हा साहेबांचा त्याग आदर्शवादी ठरत आहे. केवळ जनता आणि कार्यकर्ते हेच माझे कुटुंब असे समजून कर्तव्य बजावत आहेत. साहेब स्वत:च्या पक्षाचे संस्थापक आमदार ते नामदार झाले परंतु जनतेपासून व कार्यकर्त्यांपासून आलिप्त होऊ शकले नाहीत. पद मिळाले म्हणून गर्व बाळगला नाही. मंत्रीपदामु...

नातेपुते येथील वारकरी सांप्रादयाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा शाल,पेन,गुलाबफुल,मास्क,अल्पोहार देवून सन्मान

  नातेपुते येथील वारकरी सांप्रादयाच्या वतीने पत्रकार दिन साजरा करताना मान्यवर  संपादक           नातेपुते ता.माळशिरस येथील विठ्ठल मंदिरात वारकरी सांप्रादयाच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा शाल , पेन , गुलाबफूल , मास्क व अल्पोहार देवून सन्मानित करण्यात आले. यावेळी पत्रकार दिनानिमित्त बोलताना श्री.विनायक उराडे म्हणाले की , पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. पत्रकारामुळे आजूबाजूला घडणार्‍या घटनांची माहिती जनतेपर्यत पोहोचते. त्याच प्रमाणे पत्रकारांवर जाणूनबुजून कोणी अन्याय केला तर पत्रकाराच्या बाजूने आमचा वारकरी सांप्रादाय भक्कमपणे उभा राहील. यावेळी वारकरी सांप्रादयातील मान्यवर चंद्रकांत ठोंबरे (माजी ग्रा.प.सदस्य) , विजयदादा उराडे , जगन्नाथ सोनवळ , विनायक उराडे (सामाजिक कार्यकर्ते) , तुकारामभाऊ ठोंबरे , संजयमामा उराडे , अभिजीत महामुने , अनंता सोनवळ यांनी पत्रकारांचा सन्मान केला. यावेळी पत्रकार श्री.लतीफ नदाफ , सुनीलदादा राऊत , श्रीकांत बावीस्कर , आनंद लोंढे सर , आनंद जाधव , विलास भोसले , मनोज राऊत , प्रमोद...

६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त नातेपुते येथील विविध संस्था, पदाधिकारी यांच्याकडून पत्रकारांचा सन्मान

संपादक १)     पै.अक्षय भांड , भारत गॅस एजन्सी कार्यालय , नातेपुते  २) श्रीमती रत्नप्रभादेवी मोहित-पाटील प्रशाला व मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ नातेपुते व उमेद फाउंडेशन पिंपरी , ३) लोकमंगल सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर नातेपुते ४) सामाजिक कार्यकर्ते अमोल कुचेकर , नातेपुते ५) बी.वाय.राऊत ( माजी सरपंच) नातेपुते ग्रामपंचायत ६) महात्मा फुले समता परिषद , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी , राष्ट्रीय समाज पक्ष , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी ७) मा.श्री. माधव खांडेकर मुख्याधिकारी साहेब , नगरपंचायत नातेपुते ८) श्री गणेश प्रतिष्ठान , शेखर अटक मित्र परिवार व बिपिन भैय्या सातपुते , अॅड.दीपाली सातपुते ९) डॉ.नरेंद्र कवितके , डॉ.वैभव कवितके , संदीपदादा ठोंबरे व मित्र परिवार, नातेपुते १०) प्रमोद शिंदे , पुरोगामी महाराष्ट्र न्यूज कार्यालय , नातेपुते इ. कडून पत्रकारदिनानिमित्त नातेपुते व पंचकृषीतील पत्रकारांचा सन्मान असंख्य मान्यवरांनी करून एक आदर्श निर्माण केला त्याबद्दल सर्व संस्थांचे , सर्व सामाजिक कार्यकर्ते , विविध पक्षाचे राजकीय कार्यकर्ते यांचे आठवले परिवाराक...

राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब, माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे संपादक मा.श्री.अभिमन्यू आठवले यांना नवीन वर्षाच्या व पत्रकार दिनाच्या मोबाईलद्वारे संपर्क करून शुभेच्छा

  राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.महादेवरावजी जानकर साहेब (माजी कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र राज्य) संपादक           राष्ट्रीय समाजपक्षाचे संस्थापक मा.श्री.संघर्षमय क्रांतिकारी नेता म्हणजे महादेवरावजी जानकर साहेब होय. ६ जानेवारी पत्रकार दिन व नूतन वर्षाच्या शुभेच्छा. साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्राचे निर्भीड व सडेतोड संपादक पत्रकार श्री.अभिमन्यु आठवले यांना जानकर   साहेबांनी शुभेच्छा दिल्या. माणुसकीची “ नाळ” जपणारे , माणूसपणा असलेले , सर्व समाजप्रिय. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे मा.महादेवरावजी जानकर साहेब आहेत. संपर्कात आलेला माणूस म्हणजे माझ्यासाठी “वरदान” आहे असे साहेबांचे मत आहे. कार्यकर्त्यात सतत मिळून मिसळून राहणारे असे जानकर साहेब आहेत. जानकर साहेब म्हणजे सर्व समाजप्रिय असलेले व सर्व लहान थोर यांना आदर देणारे , प्रेमाने जवळ घेणारे , पाठीवर थाप मारणारे , जवळ आलेला कार्यकर्ता असो वा कोणताही व्यक्ति असो त्यांना जिव्हाळा , आपुलकी , जोडलेले नात ठेवणारे आहेत. ते नात परक होणार नाही अशी खबरदारी घेणारे नेते मा.महादेवराव...

लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर शाखा नातेपुते येथे ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला

  लोकमंगल सहकारी पतसंस्था मर्या.सोलापूर शाखा नातेपुते येथे पत्रकार दिन साजरा संपादक           ६ जानेवारी हा आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती व पत्रकार दिन असतो त्या निमित्ताने मा.आ.सुभाष(बापू) देशमुख , माजी मंत्री , सहकार मदत व पुनर्वसन महाराष्ट्र राज्य यांनी स्थापन केलेल्या लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था मर्या. सोलापूर शाखा नातेपुते , ता.माळशिरस , जि . सोलापूर येथे पत्रकार दिन आयोजित करण्यात आला होता. या पत्रकारादिनानिमित्त लोकमंगल पतसंस्थेकडून पत्रकारांना फाईल , न्यापकिन व गुलाबपुष्प , कॅलेंडर इ. देवून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.पी.मोरे साहेब , श्री.सुधीर काळे , श्री.औदुंबर कदम , श्री.उमेश पलंगे , श्री.अतुल दोशी उपस्थित होते. या पत्रकारदिनानिमित्त सुधीर काळे यांनी मनोगत व्यक्त केले की , पत्रकारांचा सन्मान लोकमंगल पतसंस्थेच्या वतीने होत आहे आम्ही आमचे भाग्य समजतो. लोकमंगलने नेहमीच पत्रकारांना मान सन्मान दिला आहे. नातेपुते शाखेला अगदी काही महीने झाले आहेत असे असताना या पतसंस्थेवरती ठेवीदारांन...

६ जानेवारी पत्रकार दिन (बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती)

बाळशास्त्री गंगाधर शास्त्री संपादक      बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म सन १८१२ तर काही ठिकाणी १८१० असे वर्ष आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाळशास्त्री गंगाधर शास्त्री असे आहे. त्यांच्या जीवन काळात वृत्तपत्र इतिहास संशोधन , शिक्षण क्षेत्र , धार्मिक व सामाजिक सुधारणा इ. मध्ये नाव कमविले आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी १८३२ मध्ये “दर्पण” हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक सुरू केले यामुळे ते मराठी वृत्तपत्राचे जनक व मराठी भाषेतील पहिले “संपादक व पत्रकार” म्हणून ओळखले जातात. तसेच महाराष्ट्रात पुरोगामी विचार सरणीचा पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातला त्यामुळे ते महाराष्ट्राचे “अद्य समाजसुधारक” व महाराष्ट्रातील सुधारणावादाचे प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. ६ जानेवारी पत्रकार दिन व बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती म्हणून जगभर साजरी होते. त्यानिमित्ताने सर्व चॅनेलचे संपादक , पत्रकार , वार्ताहर , छाया चित्रकार तसेच साप्ताहिक , मासिक , पाक्षिक , वार्षिक , इ.चे संपादक पत्रकार , वार्ताहर , छाया चित्रकार व इ. तसेच सर्व भारतीय बांधवांना ६ जा...

लालपरीचे चालक व वाहक जबाबदारी पत्करून “एक चाक कुटुंबावर व एक चाक रस्त्यावर” असे असताना प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत त्यांच्या असेलेल्या मागण्या महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य कराव्यात

संपादक           एसटी लाल परी ही जनतेची नाडी असून जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र धावत असते. त्यामध्ये चालक व वाहक यांची कर्तव्यनिष्ठा अत्यंत महत्वाची असते. दररोज एसटी महामंडळाला चालक व वाहक हजारो रुपये कमवून देत असतात. चालक व वाहक एक रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार करीत नाहीत. पारदर्शी व स्वच्छ अशी नोकरी करतात. सर्व क्षेत्रातील नोकरदारांना भरमसाठ पगार शासन देते , आयोग लागू केला जातो . त्यांना विविध सवलती दिल्या जातात परंतु एसटी महामंडळाच्या लालपरीच्या कर्मचार्‍यांना मात्र तुटपुंज्या पगारात निवृत्त होईपर्यंत काम करावे लागत आहे. एसटीचा नोकरदार यांची परिस्थिति अत्यंत बिकट दयनीय  अशी पाहावयास मिळत आहे. लालपरीचा चालक व वाहक स्वत : वर जबाबदारी घेवून दिवसरात्र “जनतेची सेवा व सरकारला मेवा” कमवून देत आहेत. असे असताना त्यांना मात्र कमी पगारात आयुष्य काढावे लागते. एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍याची परिस्थिति सुधारली आहे असे दिसत नाही. लालपरीचा चालक व वाहक यांची नोकरी म्हणजे “एक चाक कुटुंबावर व एक चाक रस्त्यावर” असते. कामावर गेलेला आपला माणूस परत येईल की ना...