Skip to main content

Posts

Showing posts from May, 2026

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

नातेपुते पोलिसांची मोठी कामगिरी साडेचार लाखांची चोरी अवघ्या काही दिवसांत उघड

  संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका गंभीर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत नातेपुते पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोठी कामगिरी केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरून ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या रकमेपैकी ३,५०,००० रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.           दिनांक ०५/०५/२०२६ रोजी फिर्यादी मंगेश मुकुंद दीक्षित हे मालोजीराजे बँक, नातेपुते येथून ४,५०,००० रुपये काढून आपल्या मोटरसायकलवरून पंढरपूर रोडने जात असताना, दोन अनोळखी इसमांनी त्यांना 'तुमचे पैसे पडले आहेत' अशी थाप मारून लक्ष विचलित केले आणि त्यांच्या मोटरसायकलला अडकवलेली पैशाची पिशवी चोरून नेली होती. याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाणे गुरनं 185/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.           गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी...

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी खुनाच्या गुन्हयातील आरोपी १२ तासात जेरबंद

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीतील मौजे चंद्रपुरी, तांबेवाडी, ता.माळशिरस येथे दिनांक ०८/०५/२०२६ रोजी नातेपुते पोलीस ठाणे गु. र.नं.१८८/२०२६, बी.एन.एस. कलम १०३, ११५(२), ३५२, ३५१(१), ३५१ (३), ३(५) अन्वये दिव्या अतुल गिरे मुळ रा.देवदैठन, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर. सध्या रा.चंद्रपुरी, तांबेवाडी यांचे फिर्यादीवरून त्यांचे पती अतुल वसंत गिरे, वय २९ वर्षे, मुळ रा.देवदैठन, ता.श्रीगोंदा, जि.अहिल्यानगर, सध्या रा.चंद्रपुरी, तांबेवाडी यांचा मागील भांडणाचा राग मनात धरून खुन झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली.  त्याबाबत हकीकत खालीलप्रमाणे,      दिनांक ०७/०५/२०२६ रोजी सायंकाळी ०४/०० वाचे सुमारास फिर्यादी यांचे पती अतुल गिरे व महावरी सुखदेव खोमणे, रा.चंद्रपुरी, तांबेवाडी, ता.माळशिरस यांचेत किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती. त्यानंतर रात्री ११/२५ वाचे सुमारास अतुल वसंत गिरे, वय २९ वर्षे हे त्यांना ०४/ वाजता मारहाण केल्याचा जाब विचारण्यास महावीर खोमणे याचे घरी गेले असता त्यांचेत...

नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या गहाळ मोबाईल शोध मोहिमे अंतर्गत नातेपुते पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाद्वारे ३ लाख रुपये किमतीचे एकूण 14 मोबाईल संच हस्तगत केले आहेत. हे सर्व मोबाईल आज संबंधित मूळ मालकांना बोलावून त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत मोबाईल गहाळ झाल्याबाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तपासाला गती देण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अकलुज यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोना/562 लोहार, पोना/559 वाघमोडे, पोकॉ/532 मदने, पोकॉ/362 शिंदे यांनी तांत्रीक विश्लेषणाचा वापर करून या मोबाईलचा मार्ग काढला. हस्तगत करण्यात आलेला 3,00,000/-रुपयांचा मुद्देमाल (14 मोबाईल) कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ मालकांना परत करण्यात आला आहे. ही यशस्वी कामगिरी मा.पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण आणि मा.उपविभागीय पोलीस अधिकारी यांच...