Skip to main content

Posts

Showing posts from June, 2026

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार नातेपुते शहर आणि परिसरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी आणि रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी नातेपुते पोलिसांच्या वतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध धडक मोहीम राबवण्यात आली आहे. या विशेष मोहिमेअंतर्गत पोलिसांनी विविध कलमांखाली एकूण ७८ केसेस दाखल करून ५४,४०० रुपये इतका दंड वसूल केला आहे. सध्या नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचालकांकडून वाहतूक नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होत असल्याचे दिसून येत होते. याला शिस्त लावण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. या कारवाईत प्रामुख्याने खालील नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात आली: नो पार्किंग (No Parking): बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने लावून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. ड्रिंक अँड ड्राईव्ह (Drink and Drive): मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या तळीरामांना पोलिसांनी चांगलाच हिसका दाखवला...

पोलिसांची नोकरी एक समाजसेवा: संपादक अभिमन्यु बी.आठवले

संपादक: अभिमन्यु बी. आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)   पोलीस दल हे केवळ सरकारी नोकरीचे क्षेत्र नसून ते समाजसेवेचे एक महान माध्यम आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे पोलिसांची नोकरी एक जबाबदारी, कर्तव्य आणि समाजसेवा आहे. समाजातील प्रत्येक नागरिक सुरक्षित रहावा, गुन्हेगारीला आळा बसावा, अन्यायग्रस्थांना न्याय मिळावा आणि समाजात शांतता व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी पोलीस दल अहोरात्र परिश्रम घेत असते. सण-उत्सव, निवडणुका, नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो पोलीस कर्मचारी स्वतःच्या कुटुंबापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन कर्तव्य बजावत असतात. पोलीस दलाचे ब्रीद वाक्य म्हणजे "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"   म्हणजे सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचे निर्दालन , हे ब्रीद वाक्य पोलीस सेवे मागील समाजहिताची भावना स्पष्ट करते. पोलीस केवळ गुन्हेगारावर कारवाई करत नाहीत तर हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, महिलांचे संरक्षण, जेष्ठ नागरिका...

नातेपुते येथील मंगल कार्यालयातील सोन्याच्या दागिन्याची चोरी उघड पुणे येथून महिला आरोपीकडुन मुद्देमाल हस्तगत

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात लग्नाच्या गडबडीत एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरट्याला नातेपुते पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुणे येथून अटक केली आहे. आरोपी महिलेकडून चोरीस गेलेले तब्बल ३ लाख ९८ हजार ७५५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने  पोलिसांनी हस्तगत केले आहेत.   नेमकी घटना काय? दिनांक १४ मे २०२६ रोजी नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात विवाह साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी वर कक्षात साखरपुड्याच्या तयारीमध्ये नातेवाईक व्यस्त असताना फिर्यादी हर्षवर्धन रामचंद्र ठोंबरे यांच्या आईच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेले बाबत नातेपुते पोलीस ठाणे गु.र.नं.२१३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयाचा पुढील तपास पो.ना/५६२ राकेश लोहार हे करीत आहेत. आरोपीची गुन्हा करण्याची पद्धतः- (Modus Operandi) तपासा दरम्यान असे दिसून आले की,  आरोपी महिला...