Skip to main content

Posts

Showing posts from March, 2026

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

शिखर शिंगणापूर यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; मुंगी घाटात उपविभागीय अधिकारी अकलूज विभाग मा.संतोष वाळके साहेब यांची पाहणी

    संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      दि.२७ मार्च २०२६ रोजी मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज विभाग मा.संतोष वाळके साहेब यांनी शिखर शिंगणापूर यात्रा अनुषंगाने मुंगी घाट येथे भेट दिली व सर्व बंदोबस्त व कावड यात्रा अनुषंगाने माहिती घेतली.      तसेच भाविकांना यात्रा कालावधीत अडचणी येऊ नयेत याकरिता माहिती घेतली व सूचना दिल्या.      तसेच शिखर शिंगणापूर कावड यात्रा 2026 अनुषंगाने पुरविण्यात आलेला बंदोबस्त चा आढावा घेतला. पुरविण्यात आलेला बंदोबस्त 6 पोलीस अधिकारी, 82 पोलीस अंमलदार, 30 होमगार्ड, पोलीस मुख्यालयाकडील ०१ आरसीपी पथक असा बंदोबस्त लावण्यात येणार आहे अशी माहिती दिली. बातमी अधिक जाहिरातीसाठी संपर्क संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले ९४२०३०२५६१ उपसंपादक : वैभव अ. आठवले साप्ताहिक बहुजन भूषण ,  साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र संस्थापक :  बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य                              टीप :...

आरोग्याची वारी शिवशंभोच्या दारी आरोग्य सेवेचा 2000 पेक्षा जास्त शिवभक्तांना लाभ: हिवरकर-पाटील

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र चैत्र वारीनिमित्त शिखर शिंगणापूर कावड यात्रा सुरू आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून व आरोग्य मंत्री श्री.प्रकाशजी आबिटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राजकुमार हिवरकर-पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख ओबीसी यांच्या माध्यमातून  शिवभक्तांसाठी माळशिरस तालुक्यामध्ये विविध ठिकाणी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याची निर्मिती करण्यात आली होती.      त्यापैकी नातेपुतेतील शंभू महादेवाच्या मंदिरासमोर जवळपास 2000 पेक्षा जास्त शिवभक्तांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. यामध्ये विशेषता महिला वर्ग, जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या उत्साहाने कावड यात्रेमध्ये सहभागी होत असतात ते मराठवाडा, विदर्भ, कर्नाटक आदी भागातून पायी चालत येत असतात. अनवाणी चालल्यामुळे पायातून अक्षरशा भेगातून रक्त सांडते त्यांना योग्य उपचाराची आवश्यकता असते हे उपचार वरील दवाखान्यांमधून मिळत असतात. शिवभक्तांचे ब्लड प्रेशर तपासणी व योग्य औषधोपचार इलेक्ट्रॉन पावडर ही सर्व औषधे शिवभक्तांना मोफत पुरवली गेली.   ...

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार मौजे नातेपुते येथे दि.14/03/2026 रोजी रात्री 11.00 वा.चे सुमारास पर्वतेश्वर माळ नातेपुते, ता.माळशिरस येथील विजय डोंग्या भोसले वय 35 वर्षे यास त्याची पत्नी कांती विजय भोसले व मेहुणा यया बि-या काळे रा.बारामती, ता.बारामती, जि.पुणे यांनी बारामती येथे रहायला चल, असे म्हणुन विजय भोसले याचे सोबत भांडणे करुन यया बि-या काळे याने मयत नामे विजय डोंग्या भोसले याचे डोक्यात दगड घालुन व कांती विजय भोसले हीने सुरीने विजय भोसले याचे कानावर मारुन त्यास जखमी केले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन विजय डोंग्या भोसले यास जीवे ठार मारले वगैरे मचकुरच्या फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.न 96/2026 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 103,115 (2), 352,351 (2),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याची माहीती पोलीस अधिक्षक श्री.अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रितम यावलकर सो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संतोष वाळके, मा.पोलीस निरिक्षक श्री.संजय जगताप स्था.गु.शा. सोलापुर ग्रामीण यांना माही...

राजगड नॉलेज सिटी अँड हेल्थकेअर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील विविध कोर्सेस उपलब्ध

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र     विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व आधुनिक शिक्षण मिळावे या उद्देशाने राजगड नॉलेज सिटी अँड हेल्थकेअर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रातील विविध कोर्सेसची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे.  त्यायोगे परिसरातील ग्रामीण भागातील राहणाऱ्या मुला मुलींसाठी वरील कोर्सेससाठी बारामती, पुणे, सातारा आदी शहराकडे न जाता आपल्याच भागात कोर्सेसची निर्मिती करून देण्यात आलेली आहे. त्यासाठी प्रशस्त अशी प्रयोगशाळा, लायब्ररी निर्माण करण्यात आलेली आहे, त्याचबरोबर अनुभवी शिक्षक वर्ग उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर राजगड मुक्त विद्यामंदिर मुक्त विद्यालय हे संस्थान परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील शंकरराव कॉम्प्लेक्स  येथे असलेल्या या संस्थेत इयत्ता 10 वी एस. एस. सी. व 12 वी एच.एस.सी. कला वाणिज्य व विज्ञान शाखांचे शिक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे. संस्थेला नवी दिल्ली येथील सेंट्रल बोर्ड ऑफ ओपन स्कूलिंग अँड एक्झामिनेशनची मान्यता मिळालेली असून विद्यार्...