Skip to main content

नातेपुते पोलिसांची वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर धडक कारवाई

नातेपुते पोलीसांची उल्लेखनिय कामगिरी खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीस 24 तासाच्या आत केले जेरबंद


उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार

मौजे नातेपुते येथे दि.14/03/2026 रोजी रात्री 11.00 वा.चे सुमारास पर्वतेश्वर माळ नातेपुते, ता.माळशिरस येथील विजय डोंग्या भोसले वय 35 वर्षे यास त्याची पत्नी कांती विजय भोसले व मेहुणा यया बि-या काळे रा.बारामती, ता.बारामती, जि.पुणे यांनी बारामती येथे रहायला चल, असे म्हणुन विजय भोसले याचे सोबत भांडणे करुन यया बि-या काळे याने मयत नामे विजय डोंग्या भोसले याचे डोक्यात दगड घालुन व कांती विजय भोसले हीने सुरीने विजय भोसले याचे कानावर मारुन त्यास जखमी केले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन विजय डोंग्या भोसले यास जीवे ठार मारले वगैरे मचकुरच्या फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.न 96/2026 भारतीय न्याय संहीता 2023 चे कलम 103,115 (2), 352,351 (2),3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्ह्याची माहीती पोलीस अधिक्षक श्री.अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रितम यावलकर सो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संतोष वाळके, मा.पोलीस निरिक्षक श्री.संजय जगताप स्था.गु.शा. सोलापुर ग्रामीण यांना माहीती देण्यात आली. त्या अनुशंगाने मार्गदर्शन प्राप्त करुन नातेपुते पोलीस ठाणेच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने लागलीच गुन्ह्यातील महिला आरोपी नामे कांती विजय भोसले हीस ताब्यात घेतले व गुन्ह्यातील मुख्य आरोपी यया बि-या भोसले हा फरार झाला होता.

सदर गुन्ह्याचे अनुशंगाने कांती विजय भोसले हीचेकडे चौकशी केली असता सदस्च गुन्हा मी व यया बि-या भोसले असे दोघांनी मिळून केलेबाबत तीने कबुली दिल्याने नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री.विशाल वायकर यांनी सोबत पो.ना/562 राकेश लोहार, वापोकॉ/19 संतोष वारे यांचे पथकाने गुन्हयातील मुख्य आरोपी नामे यया बि-या भोसले रा.बारामती, ता.बारामती, जि.पुणे याची गोपनिय माहीती काढुन कौशल्यपुर्ण तपास करुन तो रहीमतपुर जि.सातारा येथे मिळुन आल्याने सापळा रचुन त्याचा पाठलाग करुन त्यास रहीमतपुर जि.सातारा येथुन ताब्यात घेऊन गुन्हा घडले पासुन 24 तासाचे आत जेरबंद केले आहे.

सदस्वी कामगिरी ही मा.पोलीस अधिक्षक श्री.अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधिक्षक श्री.प्रितम यावलकर सो, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.संतोष वाळके, मा.पोलीस निरिक्षक श्री.संजय जगताप स्था.गु.शा. सोलापुर ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि श्री.विशाल वायकर व नातेपुते पोलीस ठाणेचे आरोपी शोध पथकातील म.पो.स.ई. सोनल मोरे, सफौं. सतीश पाटकुलकर, सफौ. देविदास धोत्रे, सफौ. रविंद्र गायकवाड, पोहेकॉ/511 धनाजी शेळके, पोना/562 राकेश लोहार, पोना/572 सुरेश एकतपुरे, पोकॉ/532 रणजित मदने, पोकों/2058 अस्लम शेख, मपोकों/2065 सीमा सोनवणे, चापोकों/डी। 9 संतोष वारे, चापोकॉ/1346 नवनाथ चव्हाण, सायबर शाखेचे पोलीस अंमलदार प्रविण मेटकरी यांचे विशेष पथकाने पार पाडलेली आहे अशी माहिती नातेपुते पोलिस ठाणे यांचेकडून देण्यात आली.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.   

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

शिवसेनेच्या सोलापूर जिल्हाप्रमुख पदी राजकुमार हिवरकर-पाटील

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथराव शिंदे साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी पणन मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते व महाराष्ट्र प्रदेशचे ओबीसी विभागाचे प्रमुख रमेशजी बारसकर यांच्या उपस्थितीत मंत्रालय मुंबई येथे सोलापूर जिल्ह्याचे प्रमुख ओबीसी विभाग म्हणून श्री.राजकुमार लता शंकरराव हिवरकर-पाटील यांना निवडीचे पत्र देण्यात आले. आजवर शिवसेनेमध्ये पक्षाचे जडणघडणीमध्ये मोर्चे, आंदोलन, साडेनऊ हजार पेक्षा जास्त गरिबांची केलेली ऑपरेशन, सोलापूरच्या अक्कलकोटचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे साहेब यांच्या पक्षप्रवेशावेळी मुख्य नेत्यांच्या उपस्थितीत 12 बलुत्तरांचा पक्ष म्हणून ओबीसी विभाग निर्माण करण्यामागची मुख्य नेते यांची दूरदृष्टी सर्वांसमक्ष केलेल भाषण, राष्ट्रमाता जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने 55 सायकलींच मोफत झालेल वाटप,  सवलतीच्या दरात  99000 माता-भगिनींना केलेली डाळ वाटप, सत्तावीस गावांना बचत गटाच्या माध्यमातून दिलेली ...