Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक


उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार

        नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी पैसे खिशात ठेवले व पुन्हा मी पैसे मोजत असताना ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने माझे हातातील 6200 रु हिसकावुन घेऊन पळून गेले वगैरेबाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 345/2025 भारतीय न्याय संहिता कलम 304 (2),3(5), अन्वये गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री.महादेव कदम नातेपुते पोलीस ठाणे हे करत होते.

        सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हे बारामतीकडून पुण्याकडे जात असल्याची माहिती मिळाली असता तात्काळ माळेगाव (बारामती) पोलीस ठाण्याची मदतीने क्रमांक 1) आकाश प्रकाश शिंदे, वय 24 वर्ष, राहणार सावकार गल्ली, मोरेवाडी, प्लॉट नंबर दोन, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर 2) नवनाथ किसन सरगर, वय 30 वर्ष, राहणार करगणी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली यांना ताब्यात घेतले. सदर गुन्ह्याबाबत विचारले असता गुन्हा केल्याचे कबूल केले, त्यांचा पोलीस ठाणे येथे अभिलेख तपासला असता त्यांच्यावर कोल्हापूर, सांगली  तसेच धाराशिव जिल्हा येथे चोरी व रॉबरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे. सदर आरोपी यांना सदर गुन्ह्यात अटक केली असून सध्या सदर आरोपी हे लॉकअप मध्ये बंद आहेत. तसेच सदर गुन्ह्यात हिसकावून घेऊन गेलेल्या रकमेसह 10,00,700/ रुपये किमतीचा मुद्दमाल, ( महिंद्रा थार वाहनासह मोबाईल व रोख रक्कम)

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री.अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री.संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा.पोलीस निरीक्षक श्री.महारुद्र परजने , सहा.पोलीस  फौजदार महादेव कदम, पोलीस हवालदार धनाजी शेळके, पोलीस नाईक अमोल वाघमोडे, राकेश लोहार, पोका/मनोज शिंदे, रणजित मदने, दिनेश रणवरे, जावेद आतार, नातेपुते पोलीस ठाणे तसेच सायबर शाखेकडील जुबेर तांबोळी यांनी केली आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.   

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...