संपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र पदवी हातात आहे, पण संधी, रोजगार आणि न्यायाचा हक्क मिळतोय का? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक पदवीधरांच्या मनात आहे. शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगारी, अपुऱ्या रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षातील अनिश्चितता, वाढती महागाई, कंत्राटीकरण, शैक्षणिक कर्जाचा बोजा आणि प्रशासानातील दिरंगाई यामुळे असंख्य पदवीधर अस्वस्थ आहेत. याच प्रश्नांना आवाज देण्यासाठी पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून माझी उमेदवारी. ही केवळ निवडणूक लढण्याची इच्छा नसुन पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गानी लढण्याचा संकल्प आहे. मी पैसा, सत्ता किंवा मोठ्या राजकीय यंत्रनेच्या बळावर उभा राहण्याचा दावा करीत नाही. माझी ताकद आहे सामाजिक बांधिलकी, जनहिताची भूमिका, निर्भीड पत्रकारिता आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठविण्याचा अनुभव. पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणजे केवळ विधान परिषदेत जाणारा व्यक्ती नव्हे, पदवीधर मतदार संघातील आमदारांनी निवडुन आल्या नंतर मतदारांशी संपर्क तुटता कामा नये, पदवीधरांना वाऱ्यावर सोडता कामा नये, पदव...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे