Skip to main content

पूणे विभाग पदवीधर मतदार संघातून उमेदवारी दाखल करण्याचा मानस: मा.श्री.अभिमन्यू आठवले

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज


संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र  

    नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर कारभार चांगला चालला होता. परंतु या आषाढीवारी निमित्त कामकाज होत असताना नगरसेवक यांना विश्वासात न घेता नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे कामकाज करीत आहेत. मुख्याधिकारी जोमात आणि नगरसेवक कोमात ही भयानक परिस्थिती झाली आहे. 

    नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. घरपटी, पाणीपट्टी तसेच इतर जनतेचे प्रश्न आहेत, जनतेने निवडुन दिले असताना अशा मुख्याधिकारी यांच्या मनमानीमुळे नगरसेवकांनी काय जनतेसाठी करावे हा प्रश्न नगरसेवक यांना पडला आहे. नगरसेवकांना रस्तावर उतरावे लागेल असे माजी उपनगराध्यक्स मालोजीराजे देशमुख यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत दिली. 

    यावेळी नगरपंचायतच्या सर्वं कामाचा लेखाजोखा देशमुख यांनी मांडला. मुख्याधिकारी यांना सर्वं नगरसेवकांनी धारेवर धरले, तसेच मुख्याधिकारी यांनी कामकाज नियमाप्रमाणे होत असल्याचे सांगितले. माहिती देताना देशमुख म्हणाले की, नवीन कर आकारणीचा ठराव सर्वं नगरसेवकांनी नामंजूर केला. तसेच सर्वं नगरसेवकांना विश्वासात घेऊनच कर आकारणी केली पाहिजे असे नगरसेवक यांनी सांगितले. ज्या कर आकारणीच्या नोटीसा मुख्याधिकारी यांनी वाटप करण्यास लावल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी नगरसेवक, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याकडून ५५ लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे आणि मुख्याधिकारी मनमानी कारभार करीत आहेत हे दिसत आहे.

    तसेच अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे म्हणाले की, फोन लावला तरी मुख्याधिकारी फोन उचलत नाही त्यामुळे नागरिकांच्या अडिअडचणी सोडविता येत नाहीत. मुख्याधिकारी आणि नगरसेवक यांच्यात समन्व्य पाहिजे तसेच आषाढीवारी निमित्त पालखी तळावरील पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी तसेच लोक प्रतिनिधी येणार असतील तर नगरसेवकांना माहिती नसते. आषाढीवारी निमित्त ५५ लाख रुपयेचा निधी आला आहे त्यामधून २५ लाख बांधकाम खात्याला तर ३० लाख रुपये नातेपुते नगरपंचायतला आले आहेत. असे असताना नगरसेवक यांना मुख्याधिकारी यांनी विश्वासात घेतले नाही. सदरची कामे कोणता ठेकेदार करतो, कोणत्या प्रभागात काम होतात हे ही नगरसेवक यांना माहिती नाही. या बैठकीत नगरसेवकांना संताप आला होता. तसेच नातेपुते नगरपंचायतमध्ये जे कर्मचारी आहेत की मुख्याधिकारी हेच समजत नाही ही गंभीर परिस्थिती आहे.

    आज नगरसेवकांवरती "कशी नशिबानी थट्टा आज मांडली" अशी भयानक परिस्थिती नगरसेवक यांना म्हणण्याची आली आहे. मुख्याधिकारी यांची मनमानी चालू आहे असे नगरसेवक म्हणत आहेत. जनतेला नातेपुते येथे वाली आहे का नाही? असे जनतेतून बोलले जाते. तसेच पाण्याचा प्रश्न व विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे.  

    पत्रकार परिषदेस मुख्याधिकारी विकास शिंगाडे, नगराध्यक्षा अनिता लांडगे, उपनगराध्यक्ष अतुल (बापू) पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती मामासाहेब पांढरे, माजी नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, माजी उपनगराध्यक्ष मालोजीराजे देशमुख, पाणी पुरवठा सभापती भारतीताई पांढरे, नगरसेवक रावसाहेब पांढरे, दादासाहेब उराडे, बांधकाम सभापती सुरेंद्र सोरटे, नगरसेवक आणासाहेब पांढरे, उद्योगपती अतुल बावकर, अविनाश दोशी, रणवीर देशमुख, माया उराडे, संगीता काळे, नातेपुते पोलीस स्टेशनचे सपोनि विशाल वायकर साहेब तसेच नातेपुते नगरपंचायतचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.  

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...

नातेपुते पोलिसांची मोठी कामगिरी साडेचार लाखांची चोरी अवघ्या काही दिवसांत उघड

  संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका गंभीर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत नातेपुते पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोठी कामगिरी केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरून ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या रकमेपैकी ३,५०,००० रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.           दिनांक ०५/०५/२०२६ रोजी फिर्यादी मंगेश मुकुंद दीक्षित हे मालोजीराजे बँक, नातेपुते येथून ४,५०,००० रुपये काढून आपल्या मोटरसायकलवरून पंढरपूर रोडने जात असताना, दोन अनोळखी इसमांनी त्यांना 'तुमचे पैसे पडले आहेत' अशी थाप मारून लक्ष विचलित केले आणि त्यांच्या मोटरसायकलला अडकवलेली पैशाची पिशवी चोरून नेली होती. याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाणे गुरनं 185/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.           गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी...