संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र पदवीधरांच्या हक्कासाठी, रोजगारासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी नवा संकल्प राहणार आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ हा केवळ मतदारांचा मतदार संघ नाही तर महाराष्ट्रातील सुशिक्षित, जागरूक आणि सामाजिक परिवर्तनाची अपेक्षा असलेल्या पदवीधरांचा आवाज आहे. या मतदार संघातील तरुण बेरोजगार पदवीधर, स्वयंरोजगार करणारे युवक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, अभियंते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित नागरिकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडणारा लोकप्रतिनिधी आवश्यक आहे. आज अनेक पदवीधरांच्या हातात पदवी आहे, मात्र त्यांना शिक्षणानुसार रोजगार मिळत नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी यांना परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्रे, निकालातील विलंब, भरती प्रक्रिया अनिश्चितता आणि रिक्त पदे या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. तसेच अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन ही बेरोजगारीच्या संकटात सापडले आहेत. या निवडणुकीत "पदवी प्रत्येकाच्या हातात, रोजगार प्रत्येकाच्या हक्कात...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे