संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
पदवीधरांच्या हक्कासाठी, रोजगारासाठी आणि पारदर्शक प्रशासनासाठी नवा संकल्प राहणार आहे. पुणे विभाग पदवीधर मतदार संघ हा केवळ मतदारांचा मतदार संघ नाही तर महाराष्ट्रातील सुशिक्षित, जागरूक आणि सामाजिक परिवर्तनाची अपेक्षा असलेल्या पदवीधरांचा आवाज आहे. या मतदार संघातील तरुण बेरोजगार पदवीधर, स्वयंरोजगार करणारे युवक, शिक्षक, प्राध्यापक, वकील, डॉक्टर, अभियंते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुशिक्षित नागरिकांच्या प्रश्नांना विधान परिषदेत प्रभावीपणे मांडणारा लोकप्रतिनिधी आवश्यक आहे.
आज अनेक पदवीधरांच्या हातात पदवी आहे, मात्र त्यांना शिक्षणानुसार रोजगार मिळत नाही. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी यांना परीक्षा शुल्क, परीक्षा केंद्रे, निकालातील विलंब, भरती प्रक्रिया अनिश्चितता आणि रिक्त पदे या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे. तसेच अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन ही बेरोजगारीच्या संकटात सापडले आहेत.
या निवडणुकीत "पदवी प्रत्येकाच्या हातात, रोजगार प्रत्येकाच्या हक्कात" हा विचार केंद्रस्थानी असणे आवश्यक आहे. माझ्याकडून पदवीधरांचा सन्मान, रोजगाराची हमी देणाऱ्या धोरणासाठी संघर्ष, पारदर्शक प्रशासन आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी विधान परिषदेत सातत्यांनी आवाज असू शकतो.
ही निवडणूक जात, धर्म, व्यक्तिगत टीका, किंवा केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप या वरती न लढता विचार कार्यकम आणि प्रश्नाच्या आधारे लढविणे हीच मतदार संघाची खरी गरज आहे.
माझ्या पदवीधरासाठी प्रमुख मागण्या :
१) पदवीधरांचे प्रश्न विधान परिषदेत मांडणे. शासनातील रिक्त पदांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करणे. सरकारी भरती पारदर्शक होवी यासाठी पाठपुरावा करणे.
२) स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी यांना परीक्षा शुल्कात सवलत व सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणेच.
३) ग्रामीण पदवीधरासाठी रोजगार, कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्यासाठी आवाज उठवेन.
४) स्वयंरोजगार व स्टार्टअप साठी सुलभ कर्ज, प्रशिक्षण, आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देईन.
५) उच्च शिक्षणातील शुल्कवाढ आणि विद्यार्थ्यांवरील आर्थिकभार बाबत आवाज उठवेन.
६) महिला पदवीधरासाठी रोजगार, कौशल्य विकासाच्या संधी यासाठी झटेन.
७) दिव्यांग पदवीधरासाठी शिक्षण, रोजगार आणि स्पर्धा परीक्षामध्ये प्रभावी सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारच, "निवडुन आल्यानंतर माझ्या कामाचा सार्वजनिक अहवाल दरवर्षी पादवीधरासमोर मांडेन "
सध्या देश व देशातील जनता होरपाळून गेली आहे, निवडुन दिलेले राज्यकर्ते जोमात आणि जनता कोमात अशी परिस्थिती पाहत आहोत.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment