Skip to main content

Posts

Showing posts from July, 2026

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र        नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर कारभार चांगला चालला होता. परंतु या आषाढीवारी निमित्त कामकाज होत असताना नगरसेवक यांना विश्वासात न घेता नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे कामकाज करीत आहेत. मुख्याधिकारी जोमात आणि नगरसेवक कोमात  ही भयानक परिस्थिती झाली आहे.       नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. घरपटी, पाणीपट्टी तसेच इतर जनतेचे प्रश्न आहेत, जनतेने निवडुन दिले असताना अशा मुख्याधिकारी यांच्या मनमानीमुळे नगरसेवकांनी काय जनतेसाठी करावे हा प्रश्न नगरसेवक यांना पडला आहे. नगरसेवकांना रस्तावर उतरावे लागेल असे माजी उपनगराध्यक्स मालोजीराजे देशमुख यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत दिली.       यावेळी नगरपंचायतच्या सर्वं कामाचा लेखाजोखा देशमुख यांनी मांडला. मुख्याधिकारी यांना सर्वं नगरसेवकांनी धारेवर धरले, तसेच मुख्याधिकारी यांनी कामकाज नियमाप्रमाणे होत असल्याचे सांगितले. माहिती देताना देशमुख म्हणाले की, नव...

आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखेकडून आदर्श कामगिरी

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      दिनांक २१/०६/२०२६ रोजी फिर्यादी हे त्यांच्या घरातील सदस्यांसह मुळगावावरून फलटण, जि.सातारा येथे चारचाकी वाहनातून जात असताना नातेपुते गावाजवळील बायपासजवळ आले असता अज्ञात इसमाने त्यांच्या कारच्या चाकासमोर अचानक जॅक टाकला. त्यामुळे फिर्यादीच्या गाडीचे टायर पंक्चर झाल्याने ते थांबले असता तेथे चार इसमांनी येवून त्यांना चाकूचा धाक दाखवून व काठीने मारहाण करून त्यांच्या कडील सोन्याच्या ०२ अंगठी, चैन, मंगळसुत्र व रोख रक्कम जबरीने काढून घेतले होते. त्याबाबत नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २४१/२०२६, भा. न्या. सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता.           सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयामध्ये रोडवरील प्रवाशांना अडवुन जबरी चोरी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करून कारवाई करणेबाबत गुन्हा आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक, संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकार...