संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार
दिनांक २१/०६/२०२६ रोजी फिर्यादी हे त्यांच्या घरातील सदस्यांसह मुळगावावरून फलटण, जि.सातारा येथे चारचाकी वाहनातून जात असताना नातेपुते गावाजवळील बायपासजवळ आले असता अज्ञात इसमाने त्यांच्या कारच्या चाकासमोर अचानक जॅक टाकला. त्यामुळे फिर्यादीच्या गाडीचे टायर पंक्चर झाल्याने ते थांबले असता तेथे चार इसमांनी येवून त्यांना चाकूचा धाक दाखवून व काठीने मारहाण करून त्यांच्या कडील सोन्याच्या ०२ अंगठी, चैन, मंगळसुत्र व रोख रक्कम जबरीने काढून घेतले होते. त्याबाबत नातेपुते पोलीस ठाणेस गु.र.नं. २४१/२०२६, भा. न्या. सं. कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने मा.श्री.अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी जिल्हयामध्ये रोडवरील प्रवाशांना अडवुन जबरी चोरी करणारे आरोपीचे शोध घेवुन गुन्हे उघड करून कारवाई करणेबाबत गुन्हा आढावा बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस निरीक्षक, संजय जगताप व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना सुचना दिल्या होत्या. त्यावरून संजय जगताप, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकांचे अधिकारी यांना मार्गदर्शन करून दरोडा व जबरी गुन्हे उघड करणेबाबत व रेकॉर्डवरील गुन्हेगार यांचे शोध घेणेकामी आदेशीत केले होते.
सपोनि / भिमगोंडा पाटील व त्यांचे पथक बार्शी उपविभागात मालाविषयी गुन्हयाचे अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना, सपोनि / पाटील यांचे पथकास गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नातेपुते पोलीस ठाणे गु.र. नं. २४१/२०२६, बीएनएस ३०९ (४), ३(५) मधील संशयीत आरोपी नामे १) कृष्णा शिंदे २) सुहास चौधरी हे दुचाकी वरून धाराशिवकडुन वैराग येथे चोरीच्या गुन्हयातील सोन्याचे दागिणे विक्री करीता येणार आहेत. त्यानंतर सदरची माहिती वरिष्ठांना कळवुन त्यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सपोनि / भिमगोंडा पाटील व त्यांचे पथकाने वैराग ते तुळजापुर जाणारे रोडलगत सर्जापुर गावाकडे जाणारे सापळा रचला. काही वेळानंतर मिळालेल्या बातमी प्रमाणे दोन संशयीत इसम एका मोटार सायकलवरून तुळजापुर कडुन येत असल्याचे दिसले. लागलीच पोलीस पथकाने त्यांना हाताने इशारा करून थांबविले असता, ते काही अंतरावर दुचाकी रोडवरच सोडुन तेथुन पळून जात असताना पथकातील पोलीसांनी जागीच पकडले. पकडलेल्या इसमांचे नाव गाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नांव १) सुहास विकास बौधरी, वय ३२ वर्षे, रा.जुन्या पाण्याच्या टाकीजवळ, येरमाळा, ता.कंळब, जि.धाराशिव २) कृष्णा सुरेश उर्फ मोतीराम शिंदे, वय १८ वर्षे, रा.खामकरवाडी पारधीपिडी, ता वाशी, जि.धाराशिव असे असल्याचे सांगितले.
त्यानंतर पोलीसांनी ताब्यातील वाहनाची व इसमांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात रोख व सोन्याचे दागिणे मिळुन आले. पोलीसांनी नमुद इसमांना अधिक विश्वासात घेवुन सखोल तपास केला असता त्यांनी नातेपुते पोलीस ठाणे गुरनं २४१/२०२६, बीएनएस ३०९ (४), ३(५) हा गुन्हया त्यांचे साथीदार १) रवि मोहन काळे २) अनिल उर्फ शेंडया आबा काळे, ३) छगन उर्फ पवन महादेव काळे, ४) महालिंग अर्जुन काळे, ५) राहुल अंकुश काळे सर्व रा.खामकरवाडी, ता. वाशी, जि.वाशी यांनी मिळून केल्याची कबुल दिली.
सपोनि / भिमगोंडा पाटील व त्यांचे पथकानी कौशल्यपुर्ण तपास केला असता त्यांनी त्याचे साथीदारासोबत खालील जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुली दिली.
अ.क्रं पोलीस ठाणे गुरनं / बीएनएस कलम
१ नातेपुते २४१/२०२६ बीएनएस कलम ३०९ (४) ३(५)
२ नातेपुते ११२/२०२६ बीएनएस कलम ३०९ (२) ३(५)
३ माहोळ ३७१/२०२६ बीएनएस कलम ३०९ (६) ११८(१)
४ माहोळ ५६८/२०२६ बीएनएस कलम ३०९ (४) ३(५)
आरोपी १) सुहास विकास चौधरी, २) कृष्णा सुरेश उर्फ मोतीराम शिंदे यांचेकडुन गुन्हयातील दरोड्यातील व जबरी चोरीत गेल्या मुद्देमाल पैकी ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्याची एकुण किमंत ४,७८,०००/-रू. (चालु बाजार भाव प्रमाणे) तसेच रोख रक्कम ३०,०००/- रू, गुन्हयात वापरलेले १ मोटार सायकल असा एकुण ५,०८,०००/- रू किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. नमुद आरोपी पोलीस कोठडीत असुन पुढील तपास नातेपुते पोलीस ठाणे हे करीत आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक, भिमगोंडा पाटील व पथकातील, श्रेपोसई/ ख्वाजा मुजावर, सपोफौ / निलकंठ जाधवर, प्रकाश कारटकर, पोलीस हवालदार सलीम बागवान, अजय भोसले, विजयकुमार भरले, रवि माने, दशरथ गोरे, पोना / जगदिश राठोड, पोकों/प्रमोद शिंपाळे, किरण चव्हाण, सागर ढोरे-पाटील, अनवर अत्तार, कपिल काटकर, मनोज राठोड, यश देवकते, समर्थ गाजरे, चापोकों/ दिलीप थोरात, अशुतोष जावध यांनी बजावली.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

.jpeg)
Comments
Post a Comment