उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील नामवंत, कीर्तिवंत राहिलेले समाजरत्न पुरस्काराने सन्मानित झालेले कै.राजेंद्र (भाऊ) पाटील यांचे चिरंजीव. नातेपुते नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष मा.अतुल (बापू) राजेंद्र पाटील नगरपंचायतच्या विकासाच्या लोकांभिमुख नेतृत्वाची ओळख.
नातेपुते शहराच्या विकासाचा विचार करताना केवळ रस्ते, गटारी, पाणी स्वच्छता, तसेच दिवाबत्ती एवढ्यापुरते विकासाचे चित्र मर्यादित राहत नाही. शहरातील सामान्य नागरिकांच्या "चेहऱ्यावर समाधानाचे हास्य आणणे, त्यांचा प्रश्न आपला प्रश्न" समजून घेणे आणि प्रशासक व जनता यांच्यात विकासाचा पूल निर्माण करणे हाच खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधीचा कस असतो. लोकप्रतिनिधीचे पद हे केवळ अधिकाराचे पद नसते, तर ते जबाबदारीचे पद असते, नागरिक आपल्या समस्याकडे सहानुभूतीने पाहणे, संबंधित विभागाशी संवाद साधने आणि शक्य त्या मार्गाने प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे ही लोकसेवेची खरी ओळख आहे अशी बापुंची भूमिका असते.
नातेपुते सारख्या झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरात आज अनेक प्रश्न आहेत. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, स्ट्रीट लाईट, ड्रेनेज, सार्वजनिक सुविधा, वाहतूक बाजारपेठेचे नियोजन, नागरिकांच्या मूलभूत गरजा इत्यादी सर्वं बाबींमध्ये लोकप्रतिनिधीची भूमिका अत्यंत महत्वाची असते. मा.अतुल (बापू ) पाटील साहेब यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत की, नातेपुतेच्या सर्व सामान्य नागरिकांचा आवाज नगरपंचायतपर्यत आणि नगरपंचायतच्या माध्यमातून शासनापर्यत प्रभावीपणे पोहोचविण्याचे काम सातत्याने करीत आहेत.
बापुंची भूमिका असते की, पद मोठे नसते, जनतेचा विश्वास मोठा असतो. आजच्या काळात लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्यातील संवाद अधिक मजबूत होणे गरजेचे आहे. नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणारा, जेष्ठ नागरिकांचा सन्मान करणारा, महिला व सर्व सामान्य कुटुंबाच्या प्रश्नाकडे संवेदनशीलतेने पाहणारा लोकप्रतिनिधी शहराच्या विकासाला निश्चित दिशा देऊ शकतात. नातेपुतेचा विकास हा कोणत्याही एका व्यक्तीचा विषय नसुन संपूर्ण शहराचा सामूहिक संकल्प आहे. त्यामुळे राजकीय मतभेद बाजूला ठेऊन शहर हिताला प्राधान्य देणारे नेतृत्व बापू आहेत. मा.अतुल (बापू ) पाटील साहेब यांची पदापेक्षा जनतेसोबत असलेली नाळ, राजकारणापेक्षा समाजकारण आणि आश्वासनापेक्षा प्रत्येक कामांना महत्व देण्याची भूमिका अधिक बळकट केली तर नातेपुतेच्या विकासाला निश्चित व्यापक दिशा मिळु शकते.
लोकप्रतिनिधी यांची खरी ओळख त्यांच्या पदाने होत नाही, त्यांच्या दारात आलेल्या सामान्य माणसाला किती आपलेपणाची वागणूक मिळते, त्यांचा प्रश्न कसा सोडविला जातो आणि शहरासाठी तो किती प्रामाणिक प्रयत्न करतो यावरती नेतृत्व ठरते. नातेपुतेच्या विकासासाठी एकजूट जनतेच्या प्रश्नासाठी संवेदनशीलता आणि शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी नेतृत्व हिच काळाची गरज आहे. मा.अतुल (बापू ) पाटील नावापेक्षा कामाची ओळख निर्माण करणारे नेतृत्व, जनतेचे प्रश्न ऐकणारे नेतृत्व, विकासाचे दिशा देणारे नेतृत्व, नातेपुतेचा विकास प्रत्येक नागरिकांचा विश्वास, राजकारणापेक्षा समाजकारण, पदापेक्षा जनसेवा ही भूमिका मा.अतुल (बापू ) पाटील यांची आहे. त्यांच्या आदर्श कामगिरीस हार्दिक शुभेच्छा..!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.
%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2,%20%20%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A,%20%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE.%E0%A4%AA%E0%A4%82.%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%87.jpg)
Comments
Post a Comment