Skip to main content

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी : मा.श्री.अभिमन्यू बी. आठवले

संपादक : बहुजन भूषण वृत्तपत्र 

    पदवी हातात आहे, पण संधी, रोजगार आणि न्यायाचा हक्क मिळतोय का? हा प्रश्न आज महाराष्ट्रातील प्रत्येक पदवीधरांच्या मनात आहे. शिक्षण पूर्ण करूनही बेरोजगारी, अपुऱ्या रोजगाराच्या संधी, स्पर्धा परीक्षातील अनिश्चितता, वाढती महागाई, कंत्राटीकरण, शैक्षणिक कर्जाचा बोजा आणि प्रशासानातील दिरंगाई यामुळे असंख्य पदवीधर अस्वस्थ आहेत. याच प्रश्नांना आवाज देण्यासाठी पुणे विभाग पदवीधर मतदार संघातून माझी उमेदवारी. ही केवळ निवडणूक लढण्याची इच्छा नसुन पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लोकशाही मार्गानी लढण्याचा संकल्प आहे. 

    मी पैसा, सत्ता किंवा मोठ्या राजकीय यंत्रनेच्या बळावर उभा राहण्याचा दावा करीत नाही. माझी ताकद आहे सामाजिक बांधिलकी, जनहिताची भूमिका, निर्भीड पत्रकारिता आणि सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठविण्याचा अनुभव. 

पदवीधरांचा प्रतिनिधी म्हणजे केवळ विधान परिषदेत जाणारा व्यक्ती नव्हे, पदवीधर मतदार संघातील आमदारांनी निवडुन आल्या नंतर मतदारांशी संपर्क तुटता कामा नये, पदवीधरांना वाऱ्यावर सोडता कामा नये, पदवीधरांच्या समस्या ऐकणे, त्याचा पाठपुरावा करणे, शासनाकडून उत्तर मागणे, आणि आवश्यक तेथे विधान परिषदेत प्रश्न उपस्थितीत करणे ही लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे. 

माझ्या प्रमुख भूमिखा 

    रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी ठोस पाठपुरावा करणे, स्पर्धा परीक्षातील पारदर्शकता, पदवीधरांच्या आर्थिक प्रश्नांना आवाज, शिक्षणाचा दर्जा आणि संधी, प्रशासानातील दिरंगाई विरोधी लढा. 

माझी उमेदवारी का?

    मी पदवीधरांना केवळ मतदार म्हणून पाहत नाही, तर परिवर्तनाची शक्ती म्हणून पाहतो. पदवीधर हा समाजातील सुशिक्षित घटक आहे, तो विचारू शकतो, धोरण समजू शकतो, आणि योग्य-अयोग्य याच्या विवेकाने विचार करू शकतो. त्यामुळे पदवीधर मतदार संघातील निवडणूक ही केवळ व्यक्ती निवडण्याची निवडणूक नसुन विचार भूमिखा आणि जनहिताची दिशा निवडण्याची संधी आहे. 

पैसा नव्हे - प्रश्नाची ताकद 

    आज निवडणुकांमध्ये आर्थिक शक्तीचे महत्व वाढले आहे. मात्र लोकशाहीमध्ये शेवटी मतदाराचा विवेक सर्वात मोठी ताकद आहे. माझ्याकडे मोठ्या नेत्यांची फौज नसली तरी सामान्य पदवीधरांचा विश्वास मिळविण्याची इच्छा आहे. माझ्याकडे सतेची ताकद नसली तरी सत्यासाठी उभे राहण्याची तयारी आहे. 

माझा संकल्प 

पुणे विभागातील पदवीधरांच्या प्रश्नासाठी मी उपलब्ध राहीन. 

निवडुन आलो तर विधान परिषद ही केवळ पदाची जागा न राहता पदवीधरांच्या हक्काचा आवाज बुलंद करणारे व्यासपीठ बनविण्याचा माझा प्रयत्न असेल.

पदवीधरांचा प्रश्न असेल तर आवाज माझा असेल, हक्क तुमचा असेल तर पाठपुरावा माझा असेल.

पदवीधरांचा प्रश्न असेल तर पाठपुरावा माझा असेल, ही उमेदवारी कोणत्याही पदाच्या मोहासाठी नव्हे, ही उमेदवारी आहे पदवीधरांच्या न्यायहक्कासाठी. 

माझे आवाहन 

      पदवीधर बंधू भगिनींनो, 

    आपल्या मताची किंमत ओळखा, व्यक्ती पेक्षा विचार पहा. आश्वासन यापेक्षा भूमिका पहा आणि प्रचारापेक्षा काम करण्याची तयारी पहा. पदवीधरांच्या न्यायहक्कासाठी पारदर्शक प्रशासनासाठी, रोजगारांच्या संधीसाठी आणि निर्भीड लोकप्रतिनिधीत्वसाठी माझ्या उमेदवारीला आपला आशीर्वाद आणि पाठिंबा द्या. 

मा.श्री.अभिमन्यू भानुदास आठवले 

पुणे विभाग पदवीधर मतदार संघ उमेदवार

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.  

Comments

Popular posts from this blog

बनावट बँक खाती काढून ऑनलाईन फ्रॉड करणारी टोळी जेलबंद; नातेपुते पोलिसांची आदर्श कामगिरी

          संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.           ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमका...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...