उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
पत्रकारिता करीत असताना
ती स्वच्छ केली पाहिजे. पत्रकारिता अन्याय, अत्याचार
करणार्यांचा “कर्दनकाळ” ठरावी यासाठी आम्ही पत्रकारिता करीत आहे. पत्रकारिता करीत असताना कोणाचे वाईट करता येईल या दृष्ठीने करणार नाही. आमच्या
वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे की, जे दिसेल तेच लिहले जाते.
पत्रकार हा रंजल्या गांजल्यांना आधार अशी पत्रकारिता करीत असतो. कोणाला तरी वेदना, दु:ख, व्हावे म्हणून म्हणून पत्रकारिता करीत नाही.
कोणावरही अन्याय होता कामा नये. न्याय देण्यासाठीच पत्रकारितेचा उपयोग
झाला पाहिजे. पत्रकारिता केवळ पैसे कमविणे, दहशत बसविणे, ब्लॅकमेल करणे यासाठी करायची नसते. घडणार्या घटनेची माहिती जनतेपर्यंत कशी
पोहोचेल यासाठी करायची असते. आमची पत्रकारिता अन्यायाला वाचा फोडणे असे असते. सध्याच्या
काळात नवीन पत्रकारामुळे, जुन्या पत्रकारांना बदनामीला सामोरे
जावे लागते. त्यामध्ये “तोतया” पत्रकारांचे जास्त प्रमाण आहे. पत्रकारिता ही “विस्तव”
आहे ती इतरांना चटके देताना कधीकधी पत्रकारांना सुद्धा चटके देत असते. सध्या नवीन पत्रकारांमुळे
पत्रकारितेला ग्रहण, वाळवी लागली असली तरी स्वच्छ, पारदर्शी पत्रकारिता जे करीत असताना जगाच्या पाठीवर त्या पत्रकारांना भीती
नसते. पैसे उकळण्यासाठी खंडणीच्या माध्यमातून एखाद्याचा छळ करणे मानसिक त्रास देणे
हे पत्रकारितेचे लक्षण नाही. पत्रकार हा नावासाठी असतो परंतु इतरांना मोठे करण्यात
त्यांचा मोठा हातभार असतो. पत्रकाराची लेखणी कधी जहालवादी तर कधी मवाळवादी असावी लागते.
सध्या पत्रकारांची अवस्था कडीपत्ता सारखी झाली आहे “वापरा व फेकून द्या”. मी तर म्हणेन की, पत्रकार हे गुलाम म्हणून काम करीत आहेत. संपादकाला पेपर चालवायचा असतो, त्यासाठी आर्थिक निधि लागतो. त्यामुळे राज्यकर्त्यांना दुखविता येत नाही.
त्यांचे अवैध व्यवसाय असले तरी त्यांना त्यांच्या व्यवसायविषयी चांगलेच लिहावे लागते.
आमची पत्रकारिता म्हणजे “शोध पत्रकारिता” आहे. सत्य घटनेवर आधारित लेखणीद्वारे लिखाण
केले जाते व जनतेसमोर मांडले जाते. त्यामध्ये द्वेष, मत्सर, भेदभाव असे काहीही नसते. आमची लेखणीच अन्याय करणारे आहेत त्यांना “रक्तबंबाळ”
करण्यासाठी कारण ठरते. आम्ही लिहलेल्या लेखणीतून अनेकांना मानपान सन्मान मिळाला आहे.
तर काही लोकसेवक झाले आहेत. इतरांना मोठे करणे यामध्येच आम्हाला समाधान वाटते. पत्रकाराने
चौथ्या स्तंभाचा आदर केला पाहिजे असे वाटते.
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.