संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
गुरसाळे ता.माळशिरस जि.सोलापूर येथील ग्रामपंचायत
निवडणूक होत आहे. या निवडणुकीत पॅनेल प्रमुख म्हणून श्रीकांत नानासाहेब मोरे पॅनेल
सांभाळत आहेत. फॉर्म भरणे संपले, काढून घेणे संपले, चिन्ह वाटप झाले असे असताना दिनांक 07/12/2022 वार बुधवार या दिवशी 05.30
वा. च्या सुमारास गुरसाळे येथील घराच्या पटांगणात श्रीकांत नानासाहेब मोरे व त्यांची
पत्नी बसले होते. त्या दरम्यान चारचाकी वाहनातून अज्ञात दोन व्यक्ती आले व त्यांनी
त्यांचेवरती प्राणघातक हल्ला केला. हल्या दरम्यान मोरे यांनी प्रतिकार केल्यामुळे थोडक्यात
बचावले. मोरे यांना मारण्यासाठी भाडोत्री गुंड कोणी पाठवले? मोरे
यांचा मारेकरी सुत्रधार कोण? नातेपुते पोलिस स्टेशनला फिर्याद
दिली असून पोलिस शोध घेत आहेत असे समजले. श्रीकांत नानासाहेब मोरे हे विविध सोसायटीचे
माजी चेअरमन म्हणून काम पाहिले आहे. जनमाणसात त्यांची लोकप्रियता आहे व मोरे हे मोहिते-पाटील
गटाचे कट्टर समर्थक आहेत. गुरसाळे येथील ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. मोरे हे सर्वधर्म
समभाव व सर्वात मिळून मिसळून राहत आहेत. या ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनेल उभा केल्यामुळे
त्याचा राग धरून गावातील व्यक्तीने हल्ला करण्याचा कट रचला आहे असे गुरसाळे येथील ग्रामस्थांनमधून
बोलले जात आहे. दहशत निर्माण केली गेली आहे. निवडणुका या सरळ व लोकशाही मार्गाने पार
पडल्या जाव्यात, कोणताही वाद विवाद होऊ नये. या हल्ल्यामुळे गुरसाळे
गावातील जनतेमध्ये नाराजी पसरली आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.