उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
वाखरी ता.पंढरपूर जि.सोलापूर येथे यलम्मा देवीच्या यात्रेला सुरुवात झाली
असून भागवात एकादशी दिवशी पालखी पुजारी नारायण मनोहर पोरे यांच्या
निवासस्थानापासून देवीच्या मंदिरापर्यंत वाजत गाजत नेण्यात आली दि.05/12/2022 रोजी
सोमवार रोजी यलम्मा देवीला नैवद्य दाखविण्याचा कार्यक्रम असतो. दि.06/12/2022 रोजी
मंगळवार या दिवशी पालखी नवसाची आहेर घेण्यासाठी भक्तांच्या घरी जाते. आहेर घेवून
आलेनंतर पालखी कुंडाच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी जाते.
त्यानंतर मंदिराजवळ देणगीदारांचा व इतरांचा
सहकार्य केल्याबद्दल सन्मान केला जातो. त्यानंतर पुजारी नारायण मनोहर पोरे, ज्योतीराम उर्फ परशुराम पोरे, हनुमंत
पोरे यांचा होमाचा कार्यक्रम असतो. त्या होमातून हे तिघेजण जात असतात. या देवस्थानची
स्थापना १९२४ साली झाली असून मंदिर पुर्णपणे दगडी आहे. २०२४ ला यलम्मा देवीच्या मंदिराला
१०० वर्ष पूर्ण होत आहेत. ०५/१२/२०२२ व ०६/१२/२०२२ या दोन दिवस्त यात्रा संपन्न होते.
या यात्रेवेळी लहान मुलांची खेळणी, खाद्यपदार्थ इ. दुकाने, पाळणे येत असतात. तरी सर्व भक्तांनी या यात्रेचा आनंद घ्यावा.
या यात्रेनिमित्त ग्रामपंचायतकडून स्वच्छता करण्यात आली.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.