![]() |
डॉ.एम.के. इनामदार आपले मनोगत व्यक्त करताना |
उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण
नातेपुते
तालुका माळशिरस जि.सोलापूर येथील समाजभूषण नानासाहेब देशमुख यांची ९६ वी जयंती साजरी
झाली यावेळी एस.एन.डी. इंटरनॅशनल स्कूल इमारतीच्या पहिल्या माजल्याचे भूमिपूजन डॉक्टर
एम.के. इनामदार, डॉ.एम.पी. मोरे,
कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड.डी.एन. काळे, बापूसाहेब देशमुख, माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सोलापूर बाबाराजे (दादा) देशमुख यांच्या प्रमुख
उपस्थितीत संपन्न झाले. डॉ.एम.के. इनामदार यांनी या शाळेचे कौतुक केले व या शाळेला
पाच लाख रुपयेची देणगी दिली. डॉ.एम.के. इनामदार म्हणाले, मराठी
भाषेबरोबर इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे गरजेचे आहे. या एस.एन.डी. स्कूलचे रूपांतर “वटवृक्षात”
होईल. ही संस्था नावारूपाला येईल तसेच जे उत्सव साजरे करणारे असतात त्यांनी व्यसनमुक्त
कार्यक्रम घेवून जनजागृती केली पाहिजे त्यास मी माझ्यापरीने मदत करेल असे डॉ.एम.के.
इनामदार म्हणाले. तसेच यावेळी माजी जिल्हा परिषद सोलापूर उपाध्यक्ष बाबाराजे (दादा)
देशमुख म्हणाले की, समाजभूषण नानासाहेब देशमुख यांनी जो आम्हाला
कानमंत्र दिला आहे तो म्हणजे कोणाचे चांगले करता आले नाही तर वाईट तरी करू नका त्यांच्या
विचाराने आम्ही वाटचाल करीत आहोत. कोणताही जातपात, भेदभाव न मानता
शेवटच्या घटकापर्यंत शैक्षणिक, सामाजिक, राजकीय मदत व त्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी वाटचाल सुरू आहे. यावेळी गुणवंत
विद्यार्थी यांना पारितोषिके देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी
नातेपुते नगरपंचायतच्या नगराध्यक्षा उत्कर्षाराणी पलंगे, चेअरमन
मालोजीराजे देशमुख, माऊली पाटील पं.स.सदस्य, व्हाइस चेअरमन मामासाहेब पांढरे, नातेपुते नगरपंचायतचे
मुख्याधिकारी माधव खांडेकर, नातेपुते पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी
प्रवीण संपांगे, अॅड.बी.वाय. राऊत, अॅड.शिवाजीराव
पिसाळ, जि.प.सदस्य ऋतुजा मोरे, तात्यासाहेब
देशमुख, अमरशिल देशमुख, महेश शेटे, अर्जुन जठार, बाहुबली चंकेशवरा, अतुल बावकर, विलास काळे, रोहित शेटे, विरेंद्र
दावडा, विश्वजित पिसाळ, प्राचार्य संदीप
पानसरे, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका, ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.