Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

नातेपुते पोलीस ठाणेकडून जबरी चोरी करणा-या आरोपीस २४ तासाच्या आत केले जेरबंद

उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)

नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार

     नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये मौजे नातेपुते, ता.माळशिरस येथे दिनांक ०३/०४/२०२५ रोजी सायकाळी ०७.३० वा सुमारास गुन्ह्यातील फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे, रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर व सोबत त्यांची आई माया नष्टे असे त्यांचेकडील स्कुटी गाडी क्र. एम.एच. ४५ ए.व्ही. १२६१ यावरुन नातेपुते परिसरात शिंगणापुर पाटी ते बायपास रोड मार्गे नातेपुते फडतरी जाणारे बायपास रोडवर आले असताना दोन अज्ञात इसमांनी त्यांचे पाठीमागुन येऊन फिर्यादीचे आई माया विठल नष्टे याचे गळयातील सोन्याचे दागीने बळजबरीने काढुन घेऊन मोटार सायकल वरुन पळुन गेल्याने त्याबाबत फिर्यादी नामे वैभव विठ्ठल नष्टे वय ३१ वर्षे रा. माळशिरस ता. माळशिरस जि. सोलापुर यांचे फिर्यादीवरुन नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे दिनांक ०८/०४/२०२५ रोजी १८ वा ३९ मि. गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोना/५६२ राकेश लोहार करीत होते.

     नातेपुते पोलीस ठाणेचे पोना/५६२ राकेश लोहार यांनी सिसिटीव्ही फुटेज आधारे व गोपनिय बातमीदारामार्फत खात्रीशिर बातमी मिळाली की, सदर गुन्हा करणारा सराईत रेकॉर्डवरील आरोपी मौजे मेडद ता माळशिरस येथील शिवारात संशयितरित्या फिरत आहे. अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने नातेपुते पोलीस ठाणेचे श्री महारुद्र परजने सहा. पोलीस निरीक्षक यांना माहिती देवुन गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अंमलदार यांना तात्काळ खाना करुन मौजे मेडद ता माळशिरस येथे सापळा लावुन आरोपीस ताब्यात घेवुन त्यांचे नाव पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे रा.मेडद, ता.माळशिरस, जि.सोलापुर असे असल्याचे सांगितल्याने त्यांना ताब्यात घेवुन अधिक विश्वासात घेवुन चौकशी केली असता त्यांनी गुरनं १३३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा केल्याचे कबुल दिल्याने आरोपी नामे अनिल उर्फ संदीप लवटे रा मेडद ता माळशिरस जि सोलापुर यास अटक करुन सदर गुन्हयात चोरीस गेलेले १)२४,०००/- रुपये कि.चे ०६ ग्रॅम वजनाची सोन्याची ३० मोठ्या मण्याच पोत जु.वा.कि.अं २)२४,०००/- रुपये कि.चे ०६ ग्रॅम वजनाची सोन्याची ९२ लहाण मण्याची पोत जु.वा.कि.अं व गुन्हयात वापरलेली ३)४०,०००/- रुपये कि.ची एक हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्लस मोटार सायकल तीचा आर.टी.ओ. पासींग नं. एम.एच. १४ झेड १५६ अशी असलेली जु.वा.कि.अं. असा एकुण ८८,०००/- रु मुददेमाल आरोपीच्या ताब्यातुन जप्त करण्यात आला असून त्याचा आणखीन एक साथीदार फरार असल्याने त्याचा शोध सूरू आहे

     अटक आरोपी नामे अनिल उर्फ संदीप दिलीप लवटे रा मेडद ता माळशिरस जि सोलापुर याचेवर यापूर्वी असलेले दाखल गुन्हयाची माहीती पुढीलप्रमाणे

(१) सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ८८० / २०२१ भादंवि कलम ३७९ वगैरे

(२) दौंड पोलीस ठाणे गुरनं ३९७/ २०२४ भादंवि कलम ३७९ वगैरे

(३) माळशिरस पोलीस ठाणे गुरनं १९२/२०१९ भादंवि कलम ३९९ वगैरे

(४) म्हसवड पोलीस ठाणे गुरनं ७९/२०१९ भादवि कलम ३७९

(५) माळशिरस पोलीस ठाणे गुरनं ५२/२०१६ भादंवि कलम ३७९ वगैरे

(६) इंदापूर पोलीस ठाणे गुरनं ९८६/२०२३ भादंवि कलम ३७९ वगैरे

     सदरची कामगिरी मा. पोलीस अधिक्षक साो श्री अतुल कुलकर्णी सोलापुर ग्रा., मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री प्रितम यावलकर सोलापुर ग्रा., मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर अकलुज उपविभाग अकलुज यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री.महारुद्र परजणे, पोसई/विक्रांत दिघे, पोना/५६२ राकेश लोहार, पोकॉ/५३२ रणजित मदने, पोकॉ/११४५ नितीन पनासे, पोकॉ/ २०५८ अस्लम शेख व सायबर पोलीस ठाणेचे पोहेकॉ/०५ युसुफ पठाण यांनी केली आहे.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...