नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा नगरपंचायतीने लागू केला त्यामुळे हजारो घरे, शेतीधारक, प्लॉटधारक, व्यापारी वर्ग, उमाजी नाईक नगर येथील औद्योगिक वसाहत, कमर्शिअल प्लॉट, रिंग रोड, अंतर्गत मोठे केलेले रस्ते, पुणे-पंढरपूर रोड, दहिगाव रोड, पिरळे रोड, पालखी मैदान माऊली मंदिर रोड, विठ्ठल मंदिर रोड, दवाखाने बाधित झालेले आहेत. नातेपुते शहरात २६ ठिकाणी टाकलेली वेगवेगळी आरक्षणे या विरोधात संघर्ष समितीने २४/२/२०२५ रोजी सकाळी दहा वाजता रास्ता रोको, गाव बंद आंदोलन केले होते.
नातेपुते नगरपंचायतीने टाकलेल्या आरक्षणाविरोधात आंदोलने झाली, वेळोवेळी निवेदनपण झाली परंतु नगरपंचायत नागरिकांप्रती सकारात्मक असल्याचे दिसून येत नाही म्हणून नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीने जनतेच्या हितासाठी उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला.
मुंबई हायकोर्टचे नामांकित विधीज्ञ, नातेपुते गावचे भूमिपुत्र अॅड. सतीशजी राऊत साहेब यांनी नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समितीच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि याचिका दाखल केली. राऊत साहेब शंभर टक्के नगरवासीयांकरिता मोफत लढत आहेत. यामध्ये ज्या बाधित नागरिकांना हरकती घेता आल्या नाहीत अशा नागरिकांसाठी हरकती घेता याव्यात यासाठी संघर्ष समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे.
नातेपुते नगरपंचायतीच्या समितीची अहवाल 28-02-2025 रोजी नगरपंचायतीस प्राप्त झाला आहे म्हणजे 60 दिवसाच्या आत नगरपंचायतीमधील समितीने 1966 चे कलम 28 पोटनियम चार प्रमाणे कारवाई करणे गरजेचे आहे याची मुदत योगायोगाने 28 एप्रिल 2025 रोजी संपत आहे. त्यामुळे अवघे काही दिवस, काही तास, काही मिनिटे शिल्लक आहेत. ही बाब अतिशय चिंतेची असून याकडे नगरपंचायतीने सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची गरज आहे नाहीतर नातेपुते ऐतिहासिक वारसा असलेले शहर इतिहास जमा झाल्याशिवाय राहणार नाही अशी माहिती नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समिती यांनी दिली.
यावेळी प्रारूप विकास आराखडा समितीचे राजकुमार हिवरकर, अक्षय भांड, बाबा बोडरे, बाळासाहेब पांढरे, किशोर पलंगे, महावीर दोशी, प्रकाश साळवे, जनार्धन बरडकर, मनीषा साबळे, सुनीता सोनमळे, नौशाद आतार, पोपट शिंदे, सोमनाथ भोसले, सिकंदर मुलाणी, सिकंदर मुजावर, सचिन बनकर, बाळू शेंडगे, तानाजी शेंडगे, शब्बीर शेख, सागर बरडकर, अशोक भुसारे, पप्पू बरडकर, आकाश माने आदींसह प्रारूप विकास आराखडा बाधित नागरिक उपस्थित होते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.