उपसंपादक : वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
नातेपुते पोलीस ठाणे कडून शाही मज्जिद नातेपुते या ठिकाणी दिनांक 27/03/2025 रोजी सायंकाळी 6.30 वाजता मुस्लिम धर्मियांचे पवित्र रमजान सणानिमित्त नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील व परिसरातील सर्व मुस्लिम बांधवांना इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाकरिता नातेपुते शहर व परिसरातील 150 ते 200 मुस्लिम बांधव उपस्थित होते. सदर कार्यक्रमाकरिता नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे व पोकॉ, मदने बोराटे, आवळे, देशमुख व होमगार्ड गावडे, बंडलकर, काळे, रुपनवर, माने, मारकड उपस्थित होते. तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीचे अध्यक्ष व पदाधिकारी देखील उपस्थित होते.
सदर वेळी मुस्लिम धर्मियांना रमजान ईद व गुढीपाडवा तसेच इतर सणानिमित्त हद्दीत कोठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. असे नातेपुते पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे साहेब यांनी सांगितले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.