उपसंपादक वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते पोलीस ठाणे येथे मा. पोलीस अधिक्षक सो अतुल कुलकर्णी सोलापुर ग्रामीण यांचे संकल्पनेतुन तसेच मा. अप्पर पोलीस अधिक्षक सो प्रीतम यावलकर व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे येथे दिनांक १८/०३/२०२५ रोजी सकाळी ०९ ते सायंकाळी ०७ वा चे दरम्यान महा रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबीराकरीता ज्ञानदीप ब्लड बैंक नातेपुते यांचे वतीन पोलीस ठाणे येथे ५० कॉट व ५५ प्रशिक्षीत सुसज्य स्टाफ, डॉक्टर यांचे वतीने रक्तदान घेण्याबाबत नियोजन करण्यात आले होते.
सदर शिबीराकरीता प्रभारी अधिकारी सो महारूद्र परजने, पीएसआय डिगे साहेब व पीएसआय ओमासे साहेब, नातेपुते पोलीस स्टेशनचा सर्व स्टाफ, होमगार्ड व सर्व पोलीस पाटील यांनी अथक परिश्रम घेतल्याने सदर रक्तदान शिबीरात एकुन ९०३ रक्तदात्यांनी रक्तदान करत मोठया प्रमाणात सहभाग नोंदविला आहे.
यामध्ये प्रमुख्याने मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सो अकलुज यांनी शिबीरास भेट देवन स्वता रक्तदान करून प्रभारी अधिकारी, पोलीस स्टाफ, होमगार्ड व पोलीस पाटील व शिबीरात सहभागी होणा-यां नागरिकांचा सत्कार केला. तसेच सदर रक्तदान शिबीरात नातेपुते पोलीस ठाणे यांचे नातेपुते शहरासह पोलीस ठाणे हददीतील ३१ गावातील लोकांनी उत्सुर्तपणे सहभाग नोंदवुन रक्तदान एक सर्वश्रेष्ठ दान या उक्तीप्रमाणे मोठया प्रमाणत रक्तदान केले.
तसेच नातेपुते पोलीस ठाणे हददीतील सामाजिक संस्था, पत्रकार बांधव, सर्व गावातील गणेशोत्सव व नवरात्रोत्सव मंडळाचे पदाधिकारी, आर्ट ऑफ लिव्हींगचे सर्व पदाधिकारी, हिंदु व मुस्लीम संघटनांचे पदाधिकारी, नातेपुते येथिल तृतीयपंथी लोक, ग्रामीण भागातील १३ महिला, मजुर वर्ग , शेतकरी वर्ग यांनी देखील या रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला. तसेच लोणंद येथील ०३ लोकांनी सहकुटुंब येवुन रक्तदान केले आहे. सदरचे रक्तदान शिबीर हे रात्री ०८/४५ वाजेपर्यंत रक्तदाते येत असल्याने ते सुरू ठेवले होते. आलेल्या सर्व रक्त दाते यांचे पोलीस स्टेशनच्या वतीने आभार मानले गेले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.