![]() |
मा.महारुद्र परजणे साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण |
संपादक: अभिमन्यू आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
आगामी येणारे श्रीराम नवमी, रमजान ईद, हनुमान जयंती, महात्मा फुले जयंती, गुढीपाडवा, संत झुलेलाल जयंती, भगवान महावीर जयंती, इत्यादी सणाच्या अनुषंगाने दि.२५/०३/२०२५ रोजी सायं ०५:३० ते ०६:३० वा.पर्यंत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या उपस्थितीत सर्व पोलीस पाटील व सर्व समाज बांधव यांच्या सण व उत्सवाच्या अनुषंगाने शांतता समितीची मीटिंग घेऊन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.
सदर मिटींगमध्ये २२ पोलीस पाटील व ६० ते ७० पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. सदर मीटिंगमध्ये सर्व जयंती व उत्सव शांततेत पार पाडण्याबाबत आवाहन करण्यात आले तसेच सोशल मीडियावरून कोणी आक्षेपार वक्तव्य व फोटो प्रसारित करू नयेत याबाबतही मा.महारुद्र परजणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्यावतीने सूचना देण्यात आल्या.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.