उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत दिनांक -11/02/2025 रोजी फिर्यादी नामे रेखा संतोष मोहिते वय 40 वर्ष, रा.नातेपुते यांनी पोलीस ठाणे येथे हजर राहून फिर्याद दिली की, फिर्यादी ह्या दुपारी 12.46 वाजता बँक ऑफ इंडिया शाखा नातेपुते मध्ये त्यांचे बचत खाते अकाउंट वरून 40,000/- रुपये काढून खुर्चीवर बसून मोजत असताना अनोळखी इसम वय अंदाजे 45 वर्ष हा फिर्यादीच्या जवळ येऊन माझ्याकडे फाटक्या नोटाचे बंडल आहेत असे म्हणून हातचलाकी करून त्यांच्याकडील 40,000/- रुपये स्वतःच्या हातात घेऊन त्यामधील 13,500/- काढून घेऊन फसवणूक करून निघून गेला बाबत माहिती पोलीस स्टेशनला कळताच नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, psi विक्रम दिघे, pn राकेश लोहार, यांनी बँकेतील सीसीटीव्ही प्राप्त फोटोचे व आरोपी MOB चे तांत्रिक विश्लेषण करून आरोपी बाबत माहिती घेतली असता सदर आरोपी दहिवडीच्या सातारा दिशेने जात असल्याची माहिती मिळाली.
सदर बाबत तात्काळ दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे, पोलीस हवालदार महेंद्र खाडे, गणेश खाडे, सहदेव साबळे यांना माहिती देताच त्यांनी तात्काळ नाकाबंदी लावून सदर पाहिजे आरोपीला ताब्यात घेतले.
त्यानंतर नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे, पोलीस हवालदार मनोज करडे, अमोल बंदुके, संतोष वारे, अमित भगत, रणजीत मदने, असलम शेख, अमोल देशमुख, यांनी सदर आरोपी यास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता त्याचे नाव सरफराज पिता मानू इराणी वय 43 वर्ष राहणार सय्यद नगर पुणे, असे असून त्याच्याकडे गुण्यातील रकमेबाबत विचारले असता गुन्हा केल्याचे सांगून त्याच्याकडे 11,600 रुपये मिळून आले तसेच त्याच्याकडे स्कुटी 50,000/ किमतीची असे एकूण 61,600/ रुपये किमतीचा मुद्देमाल सदर गुन्ह्यत जप्त करण्यात आला आहे. सदर आरोपी हा सराईत असून त्याने यापूर्वी सोलापूर, पुणे सांगली, धाराशिव येथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. नातेपुते पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक 35/2025 भारतीय न्याय संहिता 318(4) अन्वये गुण्यामध्ये मध्ये अटक करण्यात आले असून त्याचा पुढील तपास पोलीस नाईक अमित भगत नातेपुते पोलीस ठाणे हे करत आहेत.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.