उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर व नातेपुते येथील सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष श्रम संस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत 'युथ फॉर माय भारत व डिजिटल साक्षरतेसाठी युवक' या उद्दिष्ट्य पूर्तीसाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट व मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्या मा.पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील, मार्गदर्शक संचालक मा. डॅा. धवलसिंह मोहिते-पाटील साहेब, माजी प्राचार्य डॉ.सी. बी .कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोजे मोरोची येथे दि. ३ फेब्रुवारी ते ९ फेब्रुवारी या सात दिवसीय शिबिर संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र राज्य धनगर आरक्षण समितीचे अध्यक्ष हनुमंतराव सुळ म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना हा महाविद्यालयातील उत्कृष्ठ उपक्रम आहे. गावाला स्वच्छतेची गरज होती ती या शिबिरातून पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे. जीवनामध्ये शिक्षणाबरोबर श्रम संस्कार अधिक महत्त्वाचे आहेत. आपल्या आयुष्यामध्ये आई वडिल, गुरु, शिक्षण आणि आरोग्य यांना अधिक महत्त्व दिले पाहिजे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, लोकनेते यांच्या प्रेरणेतून मोरोची गावामध्ये शिक्षण क्रांती झाली असल्याचे नमूद केले. रोज वृत्तपत्र आणि थोरा मोठ्यांचे आत्मचरित्र चरित्र वाचन करणे गरजेचे आहे.
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ .रज्जाक शेख यांनी आपल्या अध्यक्षिय मनोगतात म्हणाले, सहकार महर्षींचा वारसा पुढे घेऊन जाणारे लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मनात सामान्य माणसाविषयी आपुलकी ममता होती, समाजसेवा हे जीवन मूल्य मानून वंचितांना विकास प्रवाहात आणून त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केले.
ते पुढे म्हणाले, तरुणांनी गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला ही खूपच कौतुकास्पद आणि दिशादर्शक आहे. "युथ फॉर माय भारत व डिजिटल साक्षरतेसाठी युवक" या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले असल्याचे त्यानी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा.उत्तम सावंत यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून कार्यक्रमाचा हेतू कथन केले.
शिबीराचे समन्वयक अखिलेश सुळ यांनी आपल्या मनोगतातून लोकनेते प्रतापसिंह मोहिते-पाटील यांचे मोरोची गावाशी ऋणानुबंध आहे त्यानी गावातील अनेक तरुण नेतृत्व उभे केले. समाजकारण केंद्रस्थानी ठेवून पप्पासाहेबांनी राजकारण केले. आजच्या युवकांच्या पाठीशी ज्येष्ठांनी सदैव उभे राहण्याचे अहवान त्यानी केले.
सदर सात दिवसीय शिबिरामध्ये सर्व ग्रामस्थासाठी विविध विषयावर तंज्ञांची बौद्धिक व्याखाने आयोजित करण्यात आली होती. तसेच ग्रामविकास, शाश्वत विकास, वृक्षारोपण व संवर्धन, जलव्यवस्थापन व संवर्धन, शिवार भेट, स्वच्छ भारत अभियान, महिला मेळावा, आरोग्य जनजागृती, मतदार जन जागृती अभियान विविध उपक्रम राबविण्यात आली .या शिबिरामध्ये ६० मुली व ४० मुले असे एकूण १०० स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.
सन्माननीय मान्यवरांचे आभार प्रा. डॉ.सुनिता सूर्यवंशी यांनी मानले सूत्रसंचालन शिबिर समन्वयक प्रा.डॉ.सी.एम साळुंखे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरीता कार्यक्रम आधिकारी प्रा. जगदिश्चंद्र मुळीक, वरिष्ठ लिपिक हनुमंत वाघमोडे, सुधाकर काळे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ,विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.