संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते, ता.माळशिरस, जि.सोलापूर येथील ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर कारभार चांगला चालला होता. परंतु या आषाढीवारी निमित्त कामकाज होत असताना नगरसेवक यांना विश्वासात न घेता नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास शिंगाडे कामकाज करीत आहेत. मुख्याधिकारी जोमात आणि नगरसेवक कोमात ही भयानक परिस्थिती झाली आहे. नगरसेवकांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. घरपटी, पाणीपट्टी तसेच इतर जनतेचे प्रश्न आहेत, जनतेने निवडुन दिले असताना अशा मुख्याधिकारी यांच्या मनमानीमुळे नगरसेवकांनी काय जनतेसाठी करावे हा प्रश्न नगरसेवक यांना पडला आहे. नगरसेवकांना रस्तावर उतरावे लागेल असे माजी उपनगराध्यक्स मालोजीराजे देशमुख यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत दिली. यावेळी नगरपंचायतच्या सर्वं कामाचा लेखाजोखा देशमुख यांनी मांडला. मुख्याधिकारी यांना सर्वं नगरसेवकांनी धारेवर धरले, तसेच मुख्याधिकारी यांनी कामकाज नियमाप्रमाणे होत असल्याचे सांगितले. माहिती देताना देशमुख म्हणाले की, नव...
साप्ताहिक बहुजन भूषण हे वृत्तपत्र प्रबोधनवादी, परिवर्तनवादी, अन्याय-अत्याचार आवाज उठवणारे