Skip to main content

जनतेच्या प्रश्ननांना आपलेसे करणारे नेतृत्व म्हणजे मा.अतुल (बापू ) राजेंद्र पाटील साहेब

पोलिसांची नोकरी एक समाजसेवा: संपादक अभिमन्यु बी.आठवले




संपादक: अभिमन्यु बी. आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र) 

पोलीस दल हे केवळ सरकारी नोकरीचे क्षेत्र नसून ते समाजसेवेचे एक महान माध्यम आहे. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे दिवस-रात्र जनतेच्या सुरक्षेसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असतात. त्यामुळे पोलिसांची नोकरी एक जबाबदारी, कर्तव्य आणि समाजसेवा आहे.

समाजातील प्रत्येक नागरिक सुरक्षित रहावा, गुन्हेगारीला आळा बसावा, अन्यायग्रस्थांना न्याय मिळावा आणि समाजात शांतता व सुव्यवस्था टिकून रहावी यासाठी पोलीस दल अहोरात्र परिश्रम घेत असते. सण-उत्सव, निवडणुका, नैसर्गिक आपत्ती, अपघात किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती असो पोलीस कर्मचारी स्वतःच्या कुटुंबापेक्षा जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन कर्तव्य बजावत असतात.

पोलीस दलाचे ब्रीद वाक्य म्हणजे "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय"  म्हणजे सज्जनाचे रक्षण आणि दुर्जनाचे निर्दालन, हे ब्रीद वाक्य पोलीस सेवे मागील समाजहिताची भावना स्पष्ट करते. पोलीस केवळ गुन्हेगारावर कारवाई करत नाहीत तर हरवलेल्या व्यक्तींना शोधणे, महिलांचे संरक्षण, जेष्ठ नागरिकांना मदत, वाहतूक नियंत्रण, अपघाती व्यवस्थापन आणि जनजागृती या सारखी अनेक समाजपयोगी कार्य करतात.

खऱ्या अर्थाने पोलीस हा समाजाचा मित्र, मार्गदर्शक, आणि रक्षक असतो. त्यांच्या गणवेशामागे जनतेची सेवा करण्याची भावना, न्याय मिळवून देण्याची तळमळ आणि राष्ट्राप्रती समर्पण दडलेले असते त्यामुळे पोलिसांची नोकरी ही केवळ उपजीविकेचे साधन नसुन राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे एक पवित्र वृत्त आहे. 

आज प्रत्येक नागरिकांनी पोलीस दलाचा सन्मान केला पाहिजे, कायद्याचे पालन करून त्यांना सहकार्य केले पाहिजे. सुरक्षित, शांततापूर्ण आणि प्रगत समाज घडविण्यासाठी पोलीस आणि जनता यांचे सहकार्य अत्यंत आवशक आहे. "गणवेशातील समाजसेवक म्हणजे पोलीस होय" 

जे पाहिले, तेच लिहिले

जनहितार्थ 

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.  





Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...

नातेपुते पोलिसांची मोठी कामगिरी साडेचार लाखांची चोरी अवघ्या काही दिवसांत उघड

  संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका गंभीर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत नातेपुते पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोठी कामगिरी केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरून ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या रकमेपैकी ३,५०,००० रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.           दिनांक ०५/०५/२०२६ रोजी फिर्यादी मंगेश मुकुंद दीक्षित हे मालोजीराजे बँक, नातेपुते येथून ४,५०,००० रुपये काढून आपल्या मोटरसायकलवरून पंढरपूर रोडने जात असताना, दोन अनोळखी इसमांनी त्यांना 'तुमचे पैसे पडले आहेत' अशी थाप मारून लक्ष विचलित केले आणि त्यांच्या मोटरसायकलला अडकवलेली पैशाची पिशवी चोरून नेली होती. याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाणे गुरनं 185/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.           गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी...