Skip to main content

पूणे विभाग पदवीधर मतदार संघातून उमेदवारी दाखल करण्याचा मानस: मा.श्री.अभिमन्यू आठवले

नातेपुते येथील मंगल कार्यालयातील सोन्याच्या दागिन्याची चोरी उघड पुणे येथून महिला आरोपीकडुन मुद्देमाल हस्तगत

संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र

नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार

नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात लग्नाच्या गडबडीत एका महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या महिला चोरट्याला नातेपुते पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पुणे येथून अटक केली आहे. आरोपी महिलेकडून चोरीस गेलेले तब्बल ३ लाख ९८ हजार ७५५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 

नेमकी घटना काय?

दिनांक १४ मे २०२६ रोजी नातेपुते येथील चैतन्य मंगल कार्यालयात विवाह साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. यावेळी वर कक्षात साखरपुड्याच्या तयारीमध्ये नातेवाईक व्यस्त असताना फिर्यादी हर्षवर्धन रामचंद्र ठोंबरे यांच्या आईच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने चोरून नेले बाबत नातेपुते पोलीस ठाणे गु.र.नं.२१३/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या गुन्हयाचा पुढील तपास पो.ना/५६२ राकेश लोहार हे करीत आहेत.

आरोपीची गुन्हा करण्याची पद्धतः- (Modus Operandi)

तपासा दरम्यान असे दिसून आले की, आरोपी महिला मंगल कार्यालयातील गर्दीचा आणि लग्नाच्या गडबडीचा फायदा घेते. फिर्यादी व त्यांचे नातेवाईक साखरपुड्याच्या तयारीमध्ये किंवा फोटो काढण्यात व्यस्त आहेत का? याचे ती बारकाईने निरीक्षण करते. त्यानंतर संधी मिळताच अतिशय शिताफीने पर्सची चैन उघडून दागिने चोरून, कोणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने ती तिथून पसार होते.


पोलिसांची धडाकेबाज कारवाई:

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी सी.सी.टी.व्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीचे (Technical Surveillance) विश्लेषण करत असताना सदरचा गुन्हा जयश्री विलास दगडे (वय ३५, रा.खुळेवाडी, पुणे) मुळ रा.शेलगाव, ता.करमाळा, जि.सोलापूर व धnजय दशरथ पवार (वय ४०, रा.खुळेवाडी, पुणे मुळ रा.अंतरवली ता.भुम, जि.धाराशिव यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने पुणे येथे सापळा रचून आरोपी महिलेला व तिचा साथीदार यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान गुन्ह्याची कबुली दिली असून महिला आरोपीकडून चोरीस गेलेले सर्व सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

यशस्वी कामगिरीः

    सदरची कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.विजय कबाडे आणि अकलूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.प्रशांत ढगळे (सहा. पोलीस अधिक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

    नातेपुते पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक श्री.विशाल वायकर, पो.स.ई. सोनल मोरे, सहा.पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस अंमलदार रणजीत मदने, महिला पोलीस अंमलदार सिमा सोनवणे, सायबर पोलीस ठाणेचे पोलीस अंमलदार प्रविण मेटकरी तसेच पो.कॉ/२७७८ हरिप्रसाद पुंडे, पो.कॉ/ ९९२५ लालू क-हे विमानतळ पोलीस ठाणे यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी केली.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

                       टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.  

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील महाविद्यालयात विविध कार्यक्रमाचा सप्ताह

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र      उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र शासन व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने २२ सप्टेंबर २०२५ ते २९ सप्टेंबर २०२५ हा आठवडा अंतर्गत महाविद्यालयात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये भारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षण संदर्भातील योगदानाचे स्मरण करण्यात आले. विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून प्रा.डॉ.बी.टी निकम यांची विद्यार्थ्यांच्यावतीने निवड करण्यात आली. कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त “ऑपरेशन सिंदूर” ही शॉर्ट फिल्म दाखविण्यात आली.       २४ सप्टेंबर राष्ट्रीय सेवा योजना स्थापन दिवसाचे औचित्य साधून प्रा.डॉ.डी.एस थोरात यांचे व्याख्यान घेण्यात आले. एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दिन दयाळ उपाध्यक्ष यांच्या जयंती निमित्त “एक दिन, एक घंटा, एक साथ" स्वच्छता अभियान अंतर्गत महाविद्यालयातील परिसरातील स्वच्छता करण्यात आली व प्लास्टिक संकलन करण्यात आले. “जागतिक पर्यावरण व आरोग्य दिवस” या विषया...

नातेपुते पोलिसांची मोठी कामगिरी साडेचार लाखांची चोरी अवघ्या काही दिवसांत उघड

  संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका गंभीर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत नातेपुते पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोठी कामगिरी केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरून ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या रकमेपैकी ३,५०,००० रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.           दिनांक ०५/०५/२०२६ रोजी फिर्यादी मंगेश मुकुंद दीक्षित हे मालोजीराजे बँक, नातेपुते येथून ४,५०,००० रुपये काढून आपल्या मोटरसायकलवरून पंढरपूर रोडने जात असताना, दोन अनोळखी इसमांनी त्यांना 'तुमचे पैसे पडले आहेत' अशी थाप मारून लक्ष विचलित केले आणि त्यांच्या मोटरसायकलला अडकवलेली पैशाची पिशवी चोरून नेली होती. याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाणे गुरनं 185/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.           गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी...