संपादक: अभिमन्यू आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
या वर्षीच्या आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व इतर शेकडो संतांच्या पालख्या वाखरी तळावर गाठीभेटी घेऊनच पंढरपूरकडे विठ्ठलाच्या भेटीसाठी मार्गस्त होत असतात.
वाखरी या गावी संत लक्ष्मणदास महाराज होऊन गेले आहेत. त्यांचा दगडी रेखीव, कोरीव असा मठ आहे, भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या वर्षी आषाढी वारीच्या निमित्ताने वाखरी ग्रामपंचायतने येणाऱ्या भाविकांसाठी बाजीराव विहीर येथील रिंगण स्थळ स्वच्छ केला आहे.
त्या ठिकाणी हिरकणी कक्ष, आरोग्य केंद्र, पिण्याचे पाणी पुरवठा नियोजन केले आहे. तसेच वाडी वस्तीवर वीज पुरवठा, फॉशिंग करणे, महिला स्नान गृह, सार्वजनिक स्वच्छता, तात्पुरते शौचालय, जिल्हा परिषद अंतर्गत दिशादर्शक फलक, हिरकणी कक्ष, इस्त्री कक्ष, पाय दाबन्यासाठी मशीन व्यवस्था, तात्पुरता दवाखाना, कटिंग, दाढी कक्ष, इत्यादी विविध सुविधा वाखरी ग्रामपंचायतकडून राबविण्यात आल्या आहेत.
यासाठी वाखरी ग्रामपंचायत चे सरपंच, उपसरपंच, सदस्य, क्लर्क जितेंद्र (नाना )पोरे, ग्रामविस्तार अधिकारी सावता शिंदे साहेब, ग्रामपंचायत सर्व कर्मचारी आषाढी वारीसाठी परिश्रम घेत आहेत.
तसेच वाखरी स्थळावर पंढरपूर नगरपालिकानी स्वच्छता केली आहे. विजवितरण कंपनीनी लाईटची सोय करून पालखी स्थळ प्रकाश मय केला आहे, पाणी पुरवठा ही केला आहे. पालखी तळावरील कट्यांना ग्रेनाईट बसविण्यात आले आहे. तसेच तेथील पालखी कट्याला रंग दिला आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.