उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
नातेपुते पोलीस ठाणे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार
आज नातेपुते पोलीस ठाणे (माळशिरस तालुका, जिल्हा सोलापूर, ग्रामीण), श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी, सातारा जिल्हा बरड येथे दिनांक 29/06/2025 रोजी मुक्काम करून दिनांक 30/06/2025 रोजी सकाळी 09.30 वाजताचे दरम्यान सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. त्यावेळी मोठ्या उत्साहामध्ये सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील भाविक भक्तांचे मोठ्या संख्येने प्रशासन व जनतेच्या वतीने स्वागत केले जाते.
जिल्हा सातारा येथून सोलापूर ग्रामीण जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना नातेपुते पोलीस ठाण्याचे हद्दीत पालखीतील भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये, पालखीतील प्रसादाची वाहने सुरळीत वेळेत पालखीतळावर पोहोच व्हावीत, वाहतूक नियमन, भाविक भक्ताची सुरक्षा व कायदा सुव्यवस्था, अनुषंगाने सोलापूर ग्रामीण पोलीस मार्फत 1600 पोलीस बंदोबस्त लावला जातो. त्यामध्ये 150 पोलीस अधिकारी, 1050 पोलिस अंमलदार, 400 होमगार्ड असे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावला जातो.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 अनुषंगाने, भाविक भक्तांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी आज नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री.प्रीतम यावलकर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली अकलूज विभागीय पोलीस अधिकारी श्री.नारायण शिरगावकर साहेब, नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री.महारुद्र परजणे, पोलीस उपनिरीक्षक श्री.किशोर तनपुरे, पोलीस हवालदार अशोक खाडे, युवराज कणसे, महेश जाधव, संतोष वारे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग पाहणी, वॉटर फिलिंग पॉईंट, पालखी विसावा, पालखी क्रॉसिंग पॉइंट, बंदोबस्त बाबत आढावा घेऊन भाविक भक्ताची गैरसोय होणारा नाही विनाअडथळा व अपघात मुक्त वारी करण्याचे नियोजन केलेले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.