![]() |
प्रशिक्षणार्थी यांना हिरवा झेंडा दावून रवाना करताना नातेपुते पोलीस ठाण्याचे सपोनी महारुद्र परजणे |
उपसंपादक: वैभव आठवले (साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र)
आषाढी वारी अनुषंगाने सोलापूर जिल्हा अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली व सोलापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस तालुक्यातून महाराष्ट्र कमांडो फाउंडेशन संचलित रेस्क्यू कमांडो फोर्स मधील कमांडो यांना कोलाड ( रायगड ) या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापनाच्या बारा दिवसाच्या प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे.
यावेळी नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे यांनी कोलाड ( रायगड ) येथे प्रशिक्षणासाठी निघालेल्या बसचे पूजन करून प्रशिक्षणासाठी निघालेल्या कमांडो व आपदा मित्र यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या व हिरवा झेंडा दाखवून प्रशिक्षणार्थ्याची बस रवाना करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र कमांडो फाउंडेशनचे अधिकारी मनोज राऊत, यश करिअर अकॅडमीचे अनिल माने तसेच कमांडो व अपदा मित्र उपस्थित होते.
या प्रशिक्षणामध्ये आत्मविश्वासाने, व्यापकपणे संकटांना तोंड देण्यासाठी प्रशिक्षणार्थ्यांना सक्षम बनवले जाते प्रशिक्षणामध्ये आपत्कालीन नियोजन, पूर यंत्रण, जोखीम मूल्यांकन, प्रथमोपचार, सीपीआर, शोध आणि बचाव कौशल्य अशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूरचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्ती सागर ढोले यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनोज राऊत यांनी केले असून आभार सुनील माने यांनी मानले.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.