वाखरी ता.पंढरपूर, जि.सोलापूर या गावात ग्रामपंचायतने राबविलेली एक आदर्श नवीन पाणी पुरवठा योजना म्हणजे "घर तेथे नळ "ही पाणीदार योजना ग्रामपंचायतने राबवून ती ग्रामस्थांच्या हिताच्या दृष्टीने आदर्श ठरली आहे.
या पाणी पुरवठा योजनेमुळे मोटार लावून पाणी भरावे लागत होते, त्यामुळे भरपूर युनिट जळत होते, वीज बिल प्रचंड येत होते, त्यामुळे मानसिक त्रास सहन करावा लागत होता. आर्थिक नुकसान भरपूर होत होते हे ग्रामस्थांना परवडणारे नव्हते त्यामुळे ग्रामस्थ चिंताग्रस्त झाले होते, परंतु इलाज नव्हता.
वाखरी ग्रामपंचायतने नवीन पाणी पुरवठा पाईप लाईन वाडी, वस्ती, गाव इत्यादी ठिकाणी राबवून ग्रामस्थांना आधार मिळाला. तसेच ही योजना कोणाच्या काळात मंजुरीसाठी पाठवली, कोणाच्या काळात मंजुरी मिळाली, कोणाच्या काळात राबविली गेली, तसेच यासाठी आमदार, खासदार, झटले हा विषय श्रेय घेण्याचा नाही. या योजनेसाठी शासनानी भरीव असा निधी दिल्यामुळे ही योजना नावारूपाला आली. सध्या मोटार न लावता पाणी १० ते १५ फुटापर्यंत पाणी मोटार विना चढते, त्यामुळे ग्रामस्थांच्या चेऱ्यावर आनंद दिसत आहे.
या नवीन पाणी पुरवठा पाईप लाईन टाकल्यामुळे ग्रामस्थांना पाणी ही मिळाले आणि वीज बिलामुळे सुटका ही झाली. आता "घर तेथे नळ "ही योजना ग्रामस्थांसाठी आदर्श ठरली आहे, पाणी मुबलक मिळत आहे. त्यामुळे गाव पाणीदार झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
यासाठी पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद वरिष्ठ अधीकारी कर्मचारी, व शासनाचे ही आभार मानले पाहिजे. तसेच ग्रामस्थांच्या हितासाठी सरपंच, उपसरपंच, सर्वं सदस्य, क्लर्क जितेंद्र (नाना )पोरे ग्रामविस्तार अधिकारी सावता शिंदे यांच्या प्रयत्नमुळे सत्यात उतरली
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.