Skip to main content

मुख्याधिकारी यांचा मनमानी कारभार, नगरसेवक असून काय उपयोग, नगरसेवक नाराज

नातेपुते नगरपंचायतीकडून नागरिकांचा विश्वास घात का? : राजकुमार हिवरकर-पाटील

 

मा. श्री. राजकुमार हिवरकर-पाटील

नातेपुते नगरपंचायतीने लागू केलेला शहर विकास आराखडा वादाच्या भोवऱ्यात असताना नगरपंचायतीकडून प्रशासकीय बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या अतिशय तीव्र स्वरूपात मांडल्या.

मुख्याधिकारी खांडेकर साहेब यांनी प्रशासकीय भूमिका सांगितली असता त्यामध्ये त्यांनी सांगितल की, रस्त्यासाठी जे आरक्षण पडले त्यासाठी कोणतीही आर्थिक भरपाई मिळणार नाही. त्याचबरोबर जे भूखंड आरक्षित केलेले आहेत ते नगरपंचायतीने स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी करावयाचे आहेत. 

नगरपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे का? नागरिकांच्या हरकतीच्या अनुषंगाने नगरपंचायतीमध्ये ०३ जानेवारी २०२५ रोजी विषय क्रमांक ५ अन्वये आरक्षण रद्द करण्याचा ठराव करण्यात आला. त्या ठरावामध्ये मुख्याधिकारी खांडेकर साहेब हे सांगतात की, हा ठराव बेकायदेशीर आहे, हा ठराव महाराष्ट्र न. प. अधिनियम १९६५ चे कलम ३०८ अन्वये रद्द होऊ शकतो तशी कायद्यामध्ये कोणतीही तरतूद नाही. 

हा ठराव करून प्रशासनाला काय सिद्ध करायच आहे? म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल की, घटनेत एखादे  कलम वाईट आहे, पण ते जर चांगल्या लोकांच्या हाती पडले  तर त्याचे रिझल्ट चांगले येतील. परंतु याउलट घटनेत एखादे कलम वाईट आहे, जर चांगल्या लोकांच्या हातात पडले तर त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले येतील.

वास्तविक पाहता नगरपंचायतीने महाराष्ट्र नगरपंचायत नगर विकास नगर रचना २८ च्या पोट-नियम (४)  या कायद्यान्वये सुधारणा करणे, बदल करणे, राजपत्रित करणे अपेक्षित होत.

पुणे-पंढरपूर रस्ता सध्याचा १०० फुटाचा अस्तित्वात आहे, तो तेवढाच ठेवणे. दहिगाव रोड सध्याचा ६० फुटाचा अस्तित्वात आहे, तो तेवढाच ठेवणे. पिरळे रोड सध्याचा २५ फुटाचा अस्तित्वात आहे, तो तेवढाच ठेवणे. पालखी तळाच्या पूर्वेला माऊली मंदिर रोड १० फुटाचा अस्तित्वात आहे, तो तेवढाच ठेवणे, कारण नातेपुते नगरपंचायत अंतर्गत येणारी अखंड बाजारपेठ व नागरीवस्ती उध्वस्त होत असल्याने हा बदल करणे अपेक्षित आहे.

रस्त्यामुळे नागरिकांची घरे, दवाखाने आदी पडझड होत असल्यामुळे अशा ठिकाणचे रस्ते करून कोणाची घरे उध्वस्त होणार नाहीत याची दखल घ्यावी. उमाजी नाईक नगरमध्ये औद्योगिक वसाहत म्हणून टाकलेला झोन रद्द करून निवासी करणे, कत्तलखाने मटन मार्केट रद्द करणे, नवीन विकसित केलेल्या भागांमध्ये रस्ते मोठे करणे किंवा ते आहे तेवढेच ठेवणे, कारण नवीन कलेक्टर एन.ए. असल्याने त्यांना अपेक्षित असणारे रस्ते आरक्षण सदर जागा मालकांनी सोडलेले आहेतच. 

त्याचबरोबर नगरपंचायत जेवढे भूखंड खरेदी करू शकते तेवढेच खरेदी करणे किंवा बदलणे अगोदर आरक्षण शासकीय जमिनीवर टाकणे, भूखंड ठरवताना नागरिकांना विश्वासात घेऊन नातेपुते प्रादेशिक योजना हद्द वाढ करून वाढवणे. कलम २८(४) च्या नियमानुसार नियोजन समिती गठीत करून वर सुनावणी घेऊन कलम २८ (४) व कलम ३० नुसार प्रारूप विकास योजनेतील अपेक्षित बदलानुसार शासनाच्या मंजूरीसाठी पाठवणे अपेक्षित आहे. 

०३/०२/२०२५ च्या केलेल्या ठरावामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे कदाचित व्यापारी, प्लॉट धारक, खरेदी करणारे, खरीददार, आसपासच्या पंचक्रोशीतून राहण्यासाठी पसंती देणारे नागरिक यांच्यामध्ये संभ्रम निर्माण होऊन ते वेगळ्या ठिकाणी जाऊन राहू शकतात. पर्यायांमध्ये बारामती, अकलूज, फलटण या शहरांमध्ये राहण्यास अथवा व्यापार करण्यासाठी जातील असे झाल्यास नातेपुते बाजारपेठेची घोडदौड मंदावणार आहे. यासाठी सकारात्मक प्रयत्नाची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री मा.श्री.एकनाथराव शिंदे साहेब, यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने जनतेच्या बाजूने सकारात्मक भूमिका घेण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. असे शिवसेना नेते राजकुमार हिवरकर-पाटील यांनी यावेळी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले.

बातमी

अधिक जाहिरातीसाठी संपर्क

संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले

९४२०३०२५६१

उपसंपादक : वैभव अ. आठवले

साप्ताहिक बहुजन भूषणसाप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र

संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य

टीप : जे दिसलेजे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments

Popular posts from this blog

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी 6,200 रुपये हिसकून घेऊन जाणाऱ्या चोरांना आपले ताब्यातील थार वाहनांसह केली अटक

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार           नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या दीपक जनार्दन चव्हाण, राहणार मोराची, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर हे फलटण-पंढरपूर रोडवरील इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे दि.01/10/2025 रोजी दुपारी 03.50 वा. सुमारास इंडीयन ऑईल कंपनीचा सुळ पेंट्रोल पंप येथे डिझेल टाकण्याचे काम करित असताना एक राखाडी रंगाची थार गाडी नं MH06CG5558 अशी डिझेल भरण्याकरीता आली व त्यातील ड्रायव्हर शेजारी बसलेल्या अनोळखी इसमाने गाडीत 4000 रुपयचे डिझेल भरायचे आहे व 6200 रु आम्हाला रोख पैशाची गरज आहे मी तुम्हाला माझे फोन पे वरून 10200 रु ऑनलाईन पाठवतो असे म्हणाल्याने मी गाडीचे डिझेलचे झाकन उघडण्यास गेलो असता पाठीमागे बसलेला अनोळखी इसम म्हणाला की, आम्हाला डिझेल नको 6200 रु रोख द्या अशी विनंती केली. त्यावेळी मी माझे खिश्यातील डिझेल विक्रीचे जमा झालेले पैसे खिश्यातुन काढुन 6200 रु मोजले त्यामध्ये 500 रु दराच्या 12 व 100 रु दराच्या 02 असे 6200 रु बाजुला काढले व बाकी ...

नातेपुते पोलीस ठाण्याची धडक कामगिरी उभ्या असलेल्या वाहनाची टायर चोरणाऱ्या अट्टल चोरास अटक व चोरीस गेलेला 100% मुद्देमाल सह 2,04,000/ किमतीचा मुद्देमाल जप्त

उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हद्दीमध्ये फिर्यादी यांच्या आकाश तानाजी बोडरे, राहणार नातेपुते, तालुका माळशिरस यांनी त्यांच्याकडील वापरते वाहन टाटा टिपर नंबर एम एच 11 सी एच 0551 या उभ्या असलेल्या वाहनाचे दोन टायर डिस्कसह किंमत 75,000/ रुपये खोलून कोणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरून नेले आहेत म्हणून वगैरे हकीगत वरून नातेपुते पोलीस ठाणे गुर नंबर 331/2025 बीएनएस कलम 303 (2) प्रमाणे गुन्हा दाखल होता.       सदर गुन्ह्यातील घडला प्रकाराबाबत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गुन्हे प्रकटीकरण पथक गुन्ह्यातील घटनास्थळाच्या आजूबाजूची सीसीटीव्ही पाहणी करून तसेच  सायबर शाखेकडील तांत्रिक माहितीचे विश्लेषण करून संशयित  आरोपीचा शोध घेतला असता संशयित आरोपी हा कडेगाव जिल्हा सांगली येथील नामे बुरान इलाही मुलाणी वय 40 वर्ष असे  असल्याबाबत खात्री झाली आणि त्यानंतर सदर आरोपीस सापळा लावून कडेगाव जिल्हा सांगली येथे...

अवैधरित्या देशी बनावटीचा गावठी कट्टा बाळगणा-या इसमास अटक अकलूज उपविभागीय गुन्हे प्रकटीकरण पथकाची विशेष कामगिरी

  उपसंपादक: वैभव आठवले साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार      नातेपुते पोलीस ठाणे हददीमध्ये पुणे पंढरपुर रोडलगत मौजे मांडवे ता माळशिरस येथे असलेल्या अहिल्याचौक येथे गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अनिकेत महादेव पडसळकर, रा. खंडाळी, ता. माळशिरस हा व्यक्ती स्वतः जवळ अवैधरीत्या विनापरवाना गावठी पिस्तूल कमरेला बाळगून फिरत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, अकलूज विभागाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने तात्काळ कारवाई केली. दिनांक २०/०९/२०२५ रोजी पहाटे ०३.२५ वाजता मौजे मांडवे, येथील अहील्या चौक ता. माळशिरस येथे सदर इसमास पकडण्यात आले. सदर आरोपीचे अंगझडती तपासणी दरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचे गावठी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर सदर घडले प्रकाराबाबत नातेपुते पोलीस ठाणेकडील पोना/५६२ राकेश माणिक लोहार यांचे फिर्यादीवरून नातेपुते पोलीस ठाणेस गुरनं ३२९/२०२५ शस्त्र अधिनियम कायदा कलम ३,२५ प्रमाणे दिनांक २०/०९/२०२५ रोजी गुन्हा दाखल केला असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास पोहे...