उपसंपादक : वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)
सध्या नातेपुते गाव हे मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जात असून महादेवाची नगरी आहे. या ठिकाणी महादेवाचे रेखीव दगडी हेमाड पणती बांधकाम केलेले मंदिर आहे. नातेपुते हे गाव सोलापूर-सातारा-पुणे या जिल्ह्याला जोडणारे असून सर्वधर्म-समभाव जपणारे गाव अशी ओळख आहे. नातेपुते हे गाव पहिले ग्रामपंचायत म्हणून ओळखले जात होते त्याचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले.
निवडणूका झाल्या, नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष झाले, नगरपंचायतला मुख्याधिकारी मिळाले. त्यामुळे नातेपुते हे विकासाचे मॉडेल बनेल, दर्जेदार विकास होईल ही अपेक्षा शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ यांना होती परंतु या गावाला कोणाची दृष्ट लागली काय माहित.
शासनाचे परिपत्रक प्रारूप विकास आराखडा करणेबाबत आले असता नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन प्रारूप विकास आराखडा बाबत चर्चा करून निर्णय घेणे योग्य होते परंतु तसे केले नाही.
नातेपुते गावाला रिंग रोडची गरज काय?, अनेक शेतकरी यांची शेती या प्रारूप विकास आराखड्यामध्ये जाताना दिसत आहे. नातेपुते नगरपंचायत मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक यांनी शेतकरी वर्गासोबत चर्चा केली पाहिजे होते.
पुणे-पंढरपूर रोड, दहिगाव रोड, उमाजी नाईक नगर, शिंदे बन, हिवरकर, घुगरदरे याचे कडील रस्ता, शिक्षक कॉलनी, वर्षां मेडिकल, पिरळे रोड, पालखी मैदान माऊली मंदिर, सोरटे वस्ती व बरडकर मळा, बोराटे मळा, इत्यादी ग्रामस्थांची शेती, घरेदारे या प्रारूप विकास आराखडा रुंदीकरण रस्त्यामुळे जाणार आहेत त्यामुळे शेतकरी, प्लॉट धारक, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.
शेती धारक, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ हे पुर्णपणे उध्वस्त होणार आहेत. प्रारूप विकास आराखडा रस्ता रुंदीकरण केल्यामुळे नागरिक बेघर होणार आहेत. नातेपुते नगरपंचायतने केलेला प्रारूप विकास आराखडा हा अन्यायकारक आहे. ग्रामस्थांना अंधारात ठेऊन प्रारूप विकास आराखडा तयार केला गेला हे माहिती अधिकारातून हाती लागलेल्या माहितीवरून सिद्ध होते.
प्रारूप विकास आराखडा करण्यासाठी का घाई केली? हा प्रश्न ग्रामस्थांना भेडसावत आहे. हा प्रारूप विकास आराखडा तयार करताना भौगोलिकदृष्ट्या अभ्यास न करता, ग्रामस्थांचे म्हणणे, त्यांच्या गरजा, अडचणी, लक्षात न घेता प्रारूप विकास आराखडा तयार केला गेला हे अयोग्य आहे.
सध्या नातेपुते नगरपंचायतकडून मूलभूत गरजा मिळत नाहीत, (पाणी उशाला कोरडं घशाला) ही भयानक परिस्थिती आहे. उत्कृष्ठ निधीतून निकृष्ट विकास योजना राबविण्यात येत आहेत. सिमेंट पाईप वापरून बंदिस्त गटार केले आहेत ते नीट-नेटके नाहीत. सोरटे वस्ती जवळ पाण्याची पाईप लाईन सतत फुटत आहे, शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. पालखी मैदान माऊली मंदिर शेजारी सिमेंट पाईप वापरून बंदिस्त गटार बनविले त्या ठिकाणी खोदाई केलेले रस्ते योग्य पद्धतीने दुरुस्त केले नाहीत, ग्रामस्थांना ये-जा करता येत नाही अशी परिस्थिती आहे.
मग प्रश्न पडतो की, जे रस्ते आहेत, ज्या मूलभूत गरजा आहेत त्या ग्रामस्थांना मिळेना आणि चालला विकास करायला? हा प्रारूप विकास आराखड्याचे गॅझेट मध्ये नोंद झाली आहे. त्यामुळे हा विकास आराखडा रद्द होऊ शकत नाही परंतु ग्रामस्थांचे म्हणणे, सूचना, वेदना समजून घेऊन शंभर टक्के यामध्ये बदल केला जाऊ शकतो, परंतु हुकूमशाही करता येत नाही. तसेच शेतकरी, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ उध्वस्त होता कामा नये यासाठी शिवसेना नेते मा.राजकुमार हिवरकर-पाटील झटत आहेत.
तसेच सर्व नगरपंचायत पदाधिकारी यांनी आंदोलनात सहभागी होऊन या प्रारूप विकास आराखडयामध्ये बदल करावा यासाठी सहभाग नोंदवावा असे वाटते. सर्व बाधित शेतकरी, प्लॉट धारक, व्यापारी, ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष यांचे पदाधिकारी यांनी रास्ता रोको, साखळी उपोषण, आंदोलनात सहभागी व्हावे असे वाटते.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.