उपसंपादक: वैभव आठवले (बहुजन भूषण वृत्तपत्र)
दि.२४-०२-२०२५ रोजी नातेपुते, ता.माळशिरस, जि. सोलापूर या ठिकाणी प्रारूप विकास आराखड्याविरोधात जनआंदोलन झाले. जनतेवर नातेपुते नगरपंचायतने लादलेला प्रारूप विकास आराखडया विरोधात जनतेतून तीव्र प्रक्रिया उमटल्या. नागरिकांच्या समस्या या आंदोलनातून स्पष्ट झाल्या. नातेपुते ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर नातेपुते गावचा प्रारूप विकास आराखडा नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी, नगरसेवक यांनी तयार केला. जनतेला विश्वासात न घेता तयार केला असा जनतेने प्रश्न उपस्थित केला. यावेळी नातेपुते गावातील अनेक नागरिकांनी, तसेच महिलांनी आपल्या तीव्र प्रतिक्रिया मनोगतातुन व्यक्त केल्या.
यावेळी मा.आ.राम सातपुते यांनी उपस्थित राहून सांगितले की,, जनतेच्या घरावरून जे आरक्षण टाकलेले आहे ते होऊ देणार नाही, जनतेवर अन्याय होणार नाही असे सांगितले, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचे सांगितले.
तसेच राजकुमार हिवरकर-पाटील यांनी पुढाकार घेऊन प्रारूप विकास आराखड्याच्या विरोधात आवाज उठवला, ते म्हणाले की, हा आराखडा जो तयार केला गेला तो जनतेवर लादला गेला असून हा आराखडा रद्द न करता कलम २८ पोट नियम ४ व ३० प्रमाणे बदल अहवाल तयार करावा. तसेच लोकांना प्रारूप विकास आराखड्या संबंधी हरकती घेता आल्या नसल्यामुळे नगरविकास खात्याकडे पाठ पुरावा करून हरकती घेण्यास सांगितले. तसेच बाधित असलेल्या जनतेसाठी मी सतत लढत राहील, त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाला लढा देण्यासाठी जीवाचे रान करीन, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री मा.एकनाथराव शिंदे साहेब यांच्याकडे प्रारूप विकास आराखड्याबाबत आवाज उठवणार आहे असे सांगितले.
यावेळी अक्षय भांड बोलताना म्हणाले की, जो पर्यंत जनतेवर लादलेला आराखड्यात बदल केला जात नाही तोपर्यंत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.
यावेळी नातेपुते नगरपंचायतचे नगरसेवक, बी. वाय.राऊत, दादा उराडे, हेमंत उराडे, रावसाहेब पांढरे उपस्थित होते. राजू पांढरे, किशोर आबा पलंगे, बाबा बोडरे, प्रकाश साळवे, उत्तम बरडकर, वर्धमान दोशी, सीमंदर दोशी, महावीर दोशी, नातेपुते नगरपंचायत प्रारूप विकास आराखडा संघर्ष समिती व नातेपुते पंच क्रोशीतील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.