१ जानेवारी भीमाकोरेगाव विजयस्तंभसंपादक (बहुजन भूषण वृत्तपत्र)
सर्व बांधवांनो १
जानेवारी रोजी भीमाकोरेगाव येथे विजयीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आपण सर्वजण जात असतो.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ हा आपली अस्मिता आहे त्या पवित्र भूमिस व शूर आपल्या बांधवांना
विनम्र अभिवादन करण्यासाठी कुटुंबासोबत जात असतो. भीमा कोरेगावचा विजयस्तंभ म्हणजे
१ जानेवारी १८१८ साली पेशवे आणि ब्रिटिश यांच्यामध्ये झालेल्या लढाईमध्ये पेशवांच्या
प्रचंड म्हणजे ४३,८३७ सैनिकांना केवळ ८३२ महार
सैनिकांनी चोख उत्तर देवून पेशव्यांना पराभूत केले हा इतिहास आहे. बांधवांनो सध्या
समाजकंटकांना हाताशी धरून त्यांना बळ देवून जातिवादी विनाकारण वादविवाद घडवून आणण्यासाठी
दृष्टहेतूने वातावरण गढूळ करण्याचे कटकारस्थान करतील. बांधवानो गाफिल राहू नका, सोबत पाणी, जेवण घेवून जावा.
शासकीय यंत्रणा तुमच्या
गाड्यांची चौकशी करीत असताना तुम्ही गाडीजवळ स्वत: थांबा, गाडीपासून
दूर जाऊ नका. तुमच्या गाडीत एखादी वस्तु ठेवून तुम्हास अडकवण्याचा डाव रचतील. भीम सैनिकांनो
नम्रपणे अभिवादन करा. नेत्यांनो भडखाऊ अशी भाषणे त्यादिवशी करू नका. इतर वेळेला तुमच्या
सभा घ्या, त्यामध्ये जे तुम्हास म्हणावयाचे आहे ते म्हणा. भीमाकोरेगाव
येथे जात आहात शिस्त बाळगा, परिसर स्वच्छ ठेवा, शांतता राखा, आपल्या बरोबर आपले कुटुंब, लहान मुले असतात त्यासाठी जबाबदार राहा. हा भीमाकोरेगाव विजयस्तंभ प्रेरणा
देणारा आहे, आदराने नतमस्तक ठेवून अभिवादन करा. सावकाश निघा, घाई गडबड करू नका, जाता तरी सुखी जावा, कोणतेही आपत्ती कोसळणार नाही यासाठी दक्ष राहा.
अभिवादन करताना सर्व आंबेडकर
चळवळीच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकसंघ राहण्याची शपथ घेवून
जातिवादी यांना धडा शिकवण्यासाठी “भीम प्रतिज्ञा” करावी असे आवाहन बहुजन राष्ट्रशक्ति
सामाजिक संघटनेचे संस्थापक अभिमन्यु बी. आठवले यांनी केले आहे. विजयीस्तंभास विनम्र
अभिवादन व सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक
शुभेच्छा...!
जय भीम, जय भारत, जय संविधान...!
जनहितार्थ
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.