उपसंपादक : बहुजन भूषण
वृत्तपत्र
पत्रकार
हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकार आजूबाजूला घडणार्या घटनेची माहिती जनतेपर्यंत
पोहोचवण्याचे पवित्र काम करीत असतो. पत्रकार हा एखाद्याला “हीरो ही करतो आणि झीरो ही
करतो” कोणताही व्यवसाय असो, संस्था असो त्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याचे
पवित्र काम पत्रकार करतो. पत्रकार हा जनतेचा सेवक आहे. पत्रकारिता करीत असताना स्वत:ची,
कुटुंबाची पर्वा न करता जनतेसाठी झटत असतो. पत्रकारांना पगार नसतो. ज्या जाहिरातीतुन
कमिशन मिळते त्यातूनच कुटुंब चालवावे लागते. पत्रकार हा कोणाचाही “दुश्मन” नसतो तो
“मित्र” असतो. डॉक्टरांनी पत्रकाराविषयी ५०% सूट देवून सहकार्य करावे. तसेच डॉक्टरांनी
पत्रकारांना ५०% सूट दिल्यामुळे आर्थिक तोटा होईल असेही काही नाही. समुद्रातील घोटभर
पाणी काढले म्हणून समुद्र कधी आठला नाही किंवा त्याची पातळी कमी झाली नाही असे आहे
का? तसेच जगाच्या पाठीवर कोणताही डॉक्टर अधिकृत नाही ते अनाधिकृत
आहेत. याचा अर्थ असा आहे की, डॉक्टरांनी पेशंट कडून किती बिल घ्यावे याला
मर्यादा नाही. तोंडातून जो शब्ध निघतो त्यानुसार डॉक्टर बिल घेतात हे ही संपादक म्हणून
अनुभवले आहे. मला आलेला अनुभव आहे. डॉक्टरांनी पत्रकारांवर उपकार करू नयेत मात्र ५०%
सवलत देवून उपचार करून माणुसकी जपावी. डॉक्टर, मेडिकलवाले सध्या “जोमात” आहेत. परंतु डॉक्टरांना
कोमात घालवायला पत्रकारांना वेळ लागणार नाही. जे डॉक्टर,
मेडिकलवाले जनतेला कसे लुटतात हे चांगले माहीत आहे. त्या डॉक्टरांची व मेडिकलवाले यांची
यादी माझ्याकडे आहे. डॉक्टर मेडिकल व इतरांची साखळी पद्धतही मला माहिती आहे असो. “डॉक्टर
देवदूत आहेत की यमदूत” हे मला चांगले माहिती आहे. पत्रकार संघटनेच्या वतीने डॉक्टर
संघटनेला निवेदन पत्र दिले असेल तर त्याचा त्वरित विचार करून त्याच्या म्हणण्यानुसार
सहकार्य ही भावना व माणुसकी जपावी असे वाटते. जे पत्रकार डॉक्टर व मेडिकलवाले यांना
त्रास देत असतील तर खुशाल त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल करावेत. जे प्रामाणिकपणे
पत्रकारिता करीत आहेत. काही प्रमाणात पत्रकारांना आरोग्यविषयी काळजी वाटते त्यामुळे
डॉक्टरांनी ५०% सूट देवून दिलासा द्यावा. संपादक म्हणून असंख्य डॉक्टर पत्रकारांना
मानणारे आहेत व माझेही असंख्य मित्र डॉक्टर आहेत तर काही घमेंडी डॉक्टर,
मेडिकलवाले आहेत हेही मी पाहत आहे. अशा दवाखान्याला व मेडिकलवाले यांच्या कुलपाची चावी
पत्रकारांकडे असते हेही लक्षात घ्यावे हे मी सडेतोड सांगतो. डॉक्टरांनी पत्रकाराविषयी
माणुसकी दाखवावी, सहकार्य करावे असे वाटते असे प्रसिद्धीद्वारे मा.श्री.डॉ.अभिमन्यु
बी.आठवले यांनी केले आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसेल, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.