संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
नातेपुते पोलिस स्टेशन यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीतील लोंढे, मोहितेवाडी, फडतरी व लोणंद परिसरातील ३०० हून अधिक नागरिकांची ई केवायसी केली नाही तर रेशन बंद होईल असे खोटे सांगुण आधारकार्ड, आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर यांचा बायोमाट्रिक थंब इंपरेशन व चेहरा यांचा वापर करून वेगवेगळया कंपनीचे सिमकार्ड काडुन त्याला बँक खाती, इतर पेमेंट अॅपलिकेशन वरून ऑनलाईन फ्रॉड केले बाबत नातेपुते पोलीस ठाणे भाग-५ गुरनं. ३४३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१६(२), ३३६(२), ३३६(३), ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३(५) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६५, ६६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ई-केवायसी केली नाही तर रेशन मिळणार नाही, असे सांगून नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर ई-केवायसीच्या प्रक्रियेच्या नावाखाली नागरिकांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक व फेस ऑथेंटिकेशनचा वापर करून त्यांच्या नावावर परस्पर मोबाईल सिमकार्ड काढण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.
सदर प्रकरणात रेशन दुकानदार वर्धमान उर्फ लाला वसगडेकर, रा. नातेपुते याने रेशन दुकानदार असल्याचा फायदा घेत त्याचे साथीदार ईश्वर शेटटी, प्रशांत पांडुरंग साठे, वैभव शिंदे, हरिराम काशिनाथ जाधव, ऋषभबाळासाहेब मोहिते, दत्ता शिंदे व दादा निंबाळकर यांच्या मदतीने नागरिकांचा विश्वास संपादन करून ई-केवायसीच्या नावाखाली त्यांची वैयक्तिक माहिती, बायोमेट्रिक तसेच फेस ऑथेंटिकेशनचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
तपासा दरम्यान करून वोडाफोन आयडिया कंपनीचे सुमारे २५० सिमकार्ड काडण्यात आलेल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे सदरचे सिमकार्ड वरून जिओ पे, एनएसडिएल पे, एरटेल पे ऑनलाईल ऑपलिकेशन ला जोडुण ऑनलाईल फ्रॉड केल्याचे तपासात निष्पण्ण झाले आहे. तरी सदर गुन्हया मध्ये जप्त केलेले मुददेमाल ३ लॅपटॉप, बायोमेट्रिक सिस्टीम, ७ मोबाईल फोन, १ जीपीएस मशीन, महिंद्र कंपनीची एक्स यु व्ही ३०० अंदाजे किंमत १०,००,०००/- तसेच, ३९,०००/- रोख रक्कम, असा एकूण अंदाजे १२,१५,०००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपी वर्धमान उर्फ लाला वसगडेकर, प्रशांत पांडुरंग साठे, हरिराम काशिनाथ जाधव, ऋषभ बाळासाहेब मोहिते, दत्ता शिंदे व दादा निंबाळकर या सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच उर्वरित दोन आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्याबाबत पुढील तपास सुरू आहे.
तपासादरम्यान आरोपींनी नागरिकांच्या नावाने विविध मोबाईल सिमकार्ड, पेमेंट बैंकिंग अॅप्स तसेच बँक खाती उघडून त्यांचा गैरवापर केल्याची बाब समोर आली आहे. सदर सिमकार्ड व खात्यांचा वापर करून ऑनलाइन आर्थिक व्यवहार, कर्जप्रकरणे अथवा इतर कोणत्याही प्रकारचा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला आहे का, याबाबत पुढील तपास करण्यात येत आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.विजय कबाडे, सोलापूर ग्रामीण, मा.अपर पोलीस अधीक्षक, प्रेरणा कट्टे पंढरपूर विभाग, तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री.संतोष वाळके अकलूज विभाग, अकलूज यांच्या मार्गदर्शनाखाली परी उपपोलीस अधीक्षक विशाल नवले, माळशिरस पोलीस ठाणे, सपोनी विशाल वायकर, नातेपुते पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली PSI महादेव पिसाळ, HC शेळके, HC राहुल रूपनवर, PN अमोल वाघमोडे, PC मनोज शिंदे, PC रणजीत मदने, PC अमोल देशमुख, PC दिनेश रणनवरे, PC नवनाथ चव्हाण तसेच सायबर पोलीस ठाणेकडील PC अजित सुरवसे यांनी कारवाई केली आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा.श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१
उपसंपादक : वैभव अ. आठवले
साप्ताहिक बहुजन भूषण, साप्ताहिक बहुजन मित्र वृत्तपत्र
संस्थापक : बहुजन राष्ट्रशक्ति सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य
टीप : जे दिसले, जे पाहिले तेच लिहिले हेच वृत्तपत्राचे ध्येय उद्दीष्ट आहे.

Comments
Post a Comment