उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण
पदवीधर बांधवांनो आणि भगिनींनो, मला मतदान का करावे यासाठी माझी कार्यपद्धती पुढीलप्रमाणे राहील:
१) बेरोजगार पदवीधरांच्या रिक्त सरकारी पदांचा नियमित आढावा घेणारच!
२) भरती प्रक्रियेला होणाऱ्या विलंबावर विधान परिषदेत प्रश्न विचारणारच!
३) स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रासाठी पाठपुरावा करणारच!
४) महाविद्यालय व विद्यापीठातील रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावणारच!
५) पदवीधरांसाठी रोजगार व कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणारच!
६) ग्रामीण पदवीधरांसाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करणारच!
७) महिला पदवीधरांच्या शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्याने आवाज उठविणारच!
८) शैक्षणिक प्रमाणपत्रे, परीक्षा निकाल, भरती प्रक्रियेतील अडचणी मांडणारच!
९) पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात पदवीधरांसाठी नियमित जन सुनावणी व प्रश्न नोंदणी करणारच!
१०) पदवीधरांचे प्रश्न ऐकणे, शासनाकडे मांडणे, उत्तर मिळवणे, पाठपुरावा करणे व पदवीधरांसमोर मांडणे अशी माझी कार्यपद्धती असणारच!
माझ्या पदवीधर बांधवांसाठी व भगिनींसाठी शिक्षण वाया जाऊ नये यासाठी प्रयत्न करणारच, कारण पदवीधर होऊन अनेक वर्षे झाली, राज्यकर्ते निवडून गेले त्यांचा विकास झाला; मात्र माझ्या पदवीधर बांधवांचा आणि भगिनींचा विकास झाला नाही. आता वेळ आली आहे, माझ्यासारखा पदवीधर उमेदवार निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी.
मी अभिमन्यु भानुदास आठवले, माझा अनुक्रमांक १४ आहे. माझे नाव वाचून माझ्या नावापुढे '१' पहिल्या पसंतीचे मत देऊन बहुमताने विजयी करावे, ही नम्र विनंती."
"वार शुक्रवार, दिनांक २३/१०/२०२६ रोजी सकाळी ०८:०० ते दुपारी ०४:०० वा. पर्यंत मतदान आहे.
आपला जिवाभावाचा उमेदवार,
अभिमन्यु भानुदास आठवले
(अपक्ष उमेदवार पुणे पदवीधर मतदार संघ )
.jpg)
