उपसंपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
"पुणे, सातारा, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या पाचही जिल्ह्यांतील पदवीधरांचे शिक्षण आणि त्यांच्या आई-वडिलांच्या कष्टाचे, घामाचे चीज केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही," असा ठाम निर्धार पुणे पदवीधर मतदारसंघाचे खंबीर अपक्ष उमेदवार मा.श्री.अभिमन्यु भानुदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे संपूर्ण मतदारसंघात पदवीधरांमध्ये आनंदाचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
कायद्याचे अभ्यासक अन् निर्भीड नेतृत्व
'साप्ताहिक बहुजन भूषण' वृत्तपत्राचे संपादक असलेले मा.श्री.अभिमन्यु भानुदास आठवले हे उच्चशिक्षित असून अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित आहेत. अनेक वर्षांपासून रोखठोक आणि निर्भीड पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी अन्यायाला वाचा फोडली आहे. सरकारी कामातील अडथळा, माहिती अधिकार कायदा (RTI), दप्तर दिरंगाई कायदा आणि ॲट्रॉसिटी ॲक्ट यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कायद्यांचे ते सखोल अभ्यासक व जाणकार आहेत. सर्वधर्मसमभाव, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यामुळे सर्वसामान्य पदवीधरांमध्ये ते कमालीचे लोकप्रिय आहेत.
सहा महिन्यांत मतदारसंघ पिंजून काढला!
निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच, गेली सहा महिने मा.श्री.अभिमन्यु भानुदास आठवले यांनी पुणे विभागातील पाचही जिल्ह्यांचा गाव आणि तालुक्यांचा दौरा करून पदवीधर बांधवांच्या थेट गाठीभेटी घेतल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढताना त्यांनी सुशिक्षित बेरोजगार, तरुण आणि प्राध्यापकांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या आहेत. एक कार्यक्षम आणि जमिनीवर काम करणारा हक्काचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने सुशिक्षित मतदारांना मोठा आधार मिळाला आहे.
निवडून आल्यास प्रत्येक तालुक्यात एक दिवस राखीव!
मा.श्री.अभिमन्यु भानुदास आठवले यांनी आपली मुख्य भूमिका मांडताना जाहीर केले की, "निवडून आल्यानंतर मी पदवीधरांना वाऱ्यावर सोडणार नाही. पुणे मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात महिन्यातून एक दिवस पदवीधर बांधवांच्या समस्या थेट सोडवण्यासाठी मी स्वतः उपस्थित राहीन. माझी निर्भीड पत्रकारिता आणि कायद्याचे ज्ञान माझ्या सुशिक्षित बंधू-भगिनींच्या न्याय् हक्कांसाठी शासन दरबारी जीवाचे रान करेल आणि पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावणारच!"
.jpg)
