संपादक: बहुजन भूषण वृत्तपत्र
पदवीधर बांधवानो आणि भगिनींनो,
निवडणुका आल्या कि, पदवीधरांची आठवण राज्यकर्ते, पक्ष, पार्टी यांना होते. आश्वासने दिली जातात, प्रश्न सोडविले जातील म्हणून खोटं बोल पण रेटून बोलतील त्यास तुम्ही बळी पडाल, आर्थिक लक्ष्मी देतील आणि निवडणुका संपल्यानंतर मात्र त्याच पदवीधरांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतील अशी त्यांची मानसिकता राहील.
माझी भूमिका स्पष्ट आहे
पदवीधरांचा वापर करून घेणे आणि निवडणुका झाल्या नंतर त्यांना फेकून दिले जाते, वाऱ्यावर सोडले जाते हे मी पाहत आलो आहे परंतु मी पदवीधर आहे, अशी माझी कधीच भूमिका राहणार नाही ते माझ्या रक्तात नाही मी तुमच्या सारखा पदवीधर आहे.
पदवीधर केवळ मतदान करणारा मतदार नाही, तो समाज्याचा सुशिक्षित घटक आहे. आपल्या कुटुंबाच्या, समाज्याच्या आणि देशाच्या भविष्यबाबत विचार करणारा नागरिक आहे. त्यामुळे पदवीधरांच्या मतांचा सन्मान करणे आणि त्यांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठविणे ही लोकशाहीतील जबाबदारी आहे. मी अनेक वर्ष संपादक /पत्रकार म्हणून माझे रोखठोक माझ्या स्वतःच्या मालकीच्या वृत्तपत्रातून निर्भीड पणे मांडत आलो आहे.
पदवीधरांचे प्रश्न निवडणूक पुरते मर्यादित नसतात
शिक्षण घेतल्यानंतर रोजगाराची संधी, बेरोजगारी, स्पर्धा परीक्षा मधील अडचणी, सरकारी भरती, खाजगी क्षेत्रातील रोजगारातील अस्थिरता, उच्च शिक्षणाचा वाढता खर्च, विद्यार्थी यांच्या वसतिगृहाचा प्रश्न, शिष्यवृती, कौशल्य विकास, आणि ग्रामीण भागातील पदवीधरांच्या समस्या, अडिअडचणी हे प्रश्न सोडविण्यासाठी माझी उमेदवारी म्हणून पदवीधरांचा आवाज निवडणुकी पुरता नव्हे, तर सातत्याने सभागृहात आणि शासनाच्या दारात पोहोचविण्यासाठी मी कठीबद्ध राहणारच.
माझे राजकारण पदवीधरांच्या सन्मानाचे
मी पदवीधरांकडे केवळ मत म्हणून पहात नाही, त्यांच्या समस्या, समजावून घेऊन त्या संबंधित शासन विभागापर्यंत पोहोचविणे, त्याचा पाठपुरावा करणे आणि मिळालेल्या उत्तराची माहिती पुन्हा पदवीधरांपर्यंत पोहोचविणे या प्रकियेला मी महत्व देणारा उमेदवार आहे. मत मागताना पदवीधर माझे असतील, आणि निवडणुकी नंतर ही पदवीधरांचे प्रश्न माझेच राहतील ही माझी भूमिका आहे. लोकप्रतिनिधी आणि मतदार यांच्यातील संबंध केवळ निवडणुकीच्या दिवशीच नसतो, तो विश्वासाचा आणि उतरदायित्वचा असतो.
तुमचे मत म्हणजे तुमचा विश्वास
पदवीधर बांधवानो आणि भगिनींनो, तुमचे मत ही केवळ मतदान यंत्रावरील एक खूण नाही, ते आपल्या अपेक्षाचे, प्रश्नाचे आणि लोकशाही वरील विश्वासाचे प्रतिनिधित्व करते, म्हणूच कोणत्याही उमेदवाराला प्रश्न विचारा. तुम्ही निवडुन आल्यास पदवीधरासाठी उपलब्ध राहणार का? पदवीधरांच्या प्रश्नाचा पाठपुरावा करणार का? पदवीधरांच्या प्रश्नांची माहिती पदवीधरांना देणार का? निवडणुका संपल्या नंतर पदवीधरांच्या संपर्कात राहणार का? हे प्रश्न विचारणे हा प्रत्येक मतदाराचा लोकशाही अधिकार आहे, मी पदवीधरांना सांगू शकतो -तुम्हाला निवडणुकीच्या काळात तुमची आठवण करणारा उमेदवार नको, तुमच्या प्रश्नाच्या काळात तुमच्या सोबत उभा राहणारा लोकप्रतिनिधी हवा, माझी भूमिका स्पष्ट आहे मी पदवीधरांचा वापर करून फेकून देणारा नाही 'कारण मीही पदवीधर आहे.
पदवीधरांच्या प्रश्नांसाठी सातत्याने उभा राहणारा आहे, निवडणूक संपली म्हणून प्रश्न संपत नाहीत, मतदान झाले म्हणून जबाबदारी संपत नाही, पद मिळाले म्हणून जनतेशी नाते संपत नाही, पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या आवाजाला लोकशाही च्या व्यासपीठावर स्थान मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न सातत्याने सुरु राहणारच, मला आपले पवित्र मत देऊन निवडुन दिल्यास आपले प्रश्न शासन दरबारी मांडत राहीनच.
पदवीधर बांधवानो आणि भगिनींनो मला मतदान का करावे यासाठी माझी कार्य पद्धती पुढील प्रमाणे राहील
1)बेरोजगार पदवीधरांच्या रिक्त सरकारी पदाचा नियमित आढावा घेणारच
2)भरती प्रक्रियेला होणाऱ्या विलंबावर विधान परिषदेत प्रश्न विचारणारच
3)स्पर्धा परीक्षा, अभ्यासिका व मार्गदर्शन केंद्रासाठी पाठपुरावा करणारच
4)महाविद्यालय व विद्यापीठातील रिक्त पदाचा प्रश्न मार्गी लावणारच
5)पदवीधरासाठी रोजगार व कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करणारच
6)ग्रामीण पदवीधरासाठी स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करणारच
7)महिला पदवीधरांच्या शिक्षण व रोजगाराच्या प्रश्नांना प्राधान्याने आवाज उठविणारच
8)शैक्षणिक प्रमाणपत्रे, परीक्षा निकाल, भरती प्रकिऱ्यातील अडचणी मांडणारच
9)पुणे सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर मतदार संघातील प्रत्येक तालूक्यात पदवीधरांसाठी नियमित जन सुनावणी व प्रश्न नोंदणी करणारच
10)पदवीधरांचे प्रश्न ऐकणे, शासनाकडे मांडणे, उत्तर मिळवणे, पाठपुरावा करणे व पदवीधरासमोर मांडणे अशी माझी कार्य पद्धती असणारच माझ्या पदवीधर बांधवा साठी व भगिनींसाठी शिक्षण वाया जाऊ नये या साठी प्रयत्न करणारच, कारण पदवीधर होऊन अनेक वर्ष झाली राज्यकर्ते निवडुन गेले त्यांचा विकास झाला मात्र माझ्या पदवीधर बांधवाचा भगिनींचा विकास झाला नाही, आता वेळ आली आहे माझ्या सारखा पदवीधर उमेदवार निवडुन देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी.
.jpg)
