उपसंपादक : बहुजन भुषण वृत्तपत्र
पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील पदवीधर बंधू-भगिनींनो,
आपणा सर्वांना माझा जय महाराष्ट्र!
मी आपल्या समोर केवळ एक उमेदवार म्हणून नव्हे, तर पदवीधरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्याची भूमिका एक पत्रकार म्हणून घेत आहे.
मी संघर्षातून आलो आहे, मी संघर्ष पाहत आहे आणि पदवीधरांच्या वेदना जवळून पाहत आहे. पदवीधर न्याय मागत असताना त्यांच्यावर अन्याय होताना दिसत आहे. अन्यायाविरोधात आवाज उठविताना अनेक अडचणींना सामना करावा लागत आहे. गेली अनेक वर्षे शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे, अन्यायाला वाचा फोडत आहे. हाच प्रदीर्घ अनुभव पाठीशी घेऊन मी पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे.
मी पाच जिल्ह्यातील पदवीधरांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी आणि आवाज उठविण्यासाठी सदैव दक्ष राहीन. त्यामध्ये माझे प्रमुख संकल्प खालीलप्रमाणे आहेत:
१) पुणे जिल्हा: शिक्षण, रोजगार, खाजगी क्षेत्रातील नवीन संधी आणि स्पर्धा परीक्षांच्या प्रलंबित प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी मी कटिबद्ध राहीनच.
२) सातारा जिल्हा: ग्रामीण भागातील पदवीधरांसाठी ठोस रोजगार मार्गदर्शन आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यासाठी विशेष प्रयत्न करणारच.
३) सोलापूर जिल्हा: ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगारी दूर करण्यासाठी कौशल्य विकास आणि नवीन उद्योगांची निर्मिती व्हावी म्हणून शासन दरबारी आग्रही पाठपुरावा करणारच.
४) सांगली जिल्हा: उच्च शिक्षण, स्थानिक उद्योग, रोजगार आणि नवनवीन व्यावसायिक संधी तरुणांना उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणारच.
५) कोल्हापूर जिल्हा: उद्योग, कौशल्यावर आधारित शाश्वत रोजगार आणि पदवीधरांच्या स्थानिक तक्रारींची त्वरित दखल घेऊन त्यांचे निवारण करून न्याय देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणारच
"मतपत्रिकेवरील अनुक्रमांक १४ समोरील चौकटीत '१' हा आपला प्रथम पसंतीक्रम नोंदवून प्रचंड बहुमताने विजयी करा!"
आपला नम्र,
अभिमन्यु भानुदास आठवले
उमेदवार, पुणे पदवीधर मतदार संघ
.jpg)
