![]() |
मा.श्री.राजकुमार हिवरकर-पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष, शिवसेना (शिंदे गट) |
संपादक : साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेना गटाला एक समाज भिमुख नेतृत्व मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या रूपाने लाभले आहे. आरोग्य मंत्री मा.तानाजी सावंत महाराष्ट्र राज्य, मा.शिवाजी सावंत शिवसेना (शिंदे गट नेते) यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील जनतेच्या आरोग्याचा प्रश्न, मागणीनुसार गाव पातळीवर विकासात्मक निधी, ५० हजाराच्या वर कुटुंबाना चणा डाळ वाटप, नातेपुते गावाच्या सर्वागीन विकासासाठी रस्ते व इतर कामासाठी भरीव निधी, जनतेसाठी नातेपुते रुग्णालय येथे ऍम्ब्युलन्स, सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सतत जनतेला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी शासन दरभारी पाठपुरावा करीत आहेत.
तसेच नातेपुते येथे ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी १०० बेडचे सुसज्ज असे जनतेच्या हितासाठी उपक्रम राबविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत व मंजुरी साठी वेळ पैसे, मानसिक त्रास सहन करून मंत्रालय मुंबई येथे जाऊन पाठपुरावा करीत आहेत. मा.मुख्यमंत्री शिंदे गट यांना माळशिरस तालुका अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातील एकमेव तालुका अध्यक्ष मा.राजकुमार हिवरकर पाटील होय. जनतेच्या मनातील काम करणारा आपला माणूस म्हणून नाव लौकिक, ओळख निर्माण झाली आहे. राजकुमार हिवरकर-पाटील अधिकारी यांना घाम फोडत आहेत, जे कायदेशीर आहे ते केलेच पाहिजे यासाठी झटत आहेत. आपले कर्तव्य समजून जनतेसाठी झटत आहेत. कधी गर्व नाही, अगदी मनमोकळेपणाने आपूलकीने आदर करीत असतात. जशी वेळ तशा संघर्ष हे त्याचे संघर्षमय जीवन आहे. जो पर्यंत सरळ तो पर्यंत सरळ, आडवा त्याला आडवा अशी भूमिका असते.
नातेपुते गावातील अनेक वर्ष जे कुटुंब ग्रामपंचायत ते नगरपंचायत हद्दीमध्ये राहत आहेत परंतु राहत असलेली जागा नावावर होत नव्हती त्यासाठी पाठपुरावा केला आहे. तोही प्रश्न सुटेल, जवळ आलेला माणूस लांब जाता कामा नये यासाठी पालन करतात. लहान असो मोठा असो त्यांना आदर देतात. मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांनी माळशिरस तालुक्यात शिवसेना (शिंदे गट) नावारूपाला आणली आहे.
राजकुमार हिवरकर-पाटील खंबीर, धाडशी असे नेतृत्व आहेत. शिंदे गटाला जबरदस्त नेतृत्व मिळाले आहे. त्यांच्या कामाचा लेखा जोखा मांडत असताना जे दिसले तेच मांडले. मा.राजकुमार हिवरकर-पाटील यांच्या कामाची पोहच पावती जनतेच्या मनामध्ये घर करीत आहे हे मात्र संपादक म्हणून सत्य आहे.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१