संपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
दलित पँथर नावाची संघटना संपूर्ण देशाला ओळख आहे परंतु दलित पँथर ही चळवळ संपू नये ती चालू रहावी यासाठी नव्याने दलित पँथरची स्थापना दि.०३ ऑगस्ट २०२३ संस्थापक अध्यक्ष मा.श्री.अंबादास शिंदे सर यांनी करून चळवळ गतिमान करण्यासाठी, अन्याय-अत्याचारा विरोधी लढा देण्यासाठी हक्क व अधिकार मिळविण्यासाठी दलित पँथर संघटनेची बांधणी केली जात आहे.
या दलित पँथर संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे १३ वे वंशेज शिवश्री फत्तेसिंहराजे भोसले हे या दलित पँथर संघटनेचे नूतन अध्यक्ष आहेत. मा.अंबादास शिंदे सर यांनी ॲट्रोसिटी अॅक्ट, मी विद्रोही, द ग्रेट सम्राट अशी पुस्तके लिहली आहेत. सरकारी अधिकारी यांना घाम फोडणारे मा.अंबादास शिंदे सर आहेत. या दलित पँथर संघटनेचे २३ जिल्ह्यामध्ये काम चालू आहे. ज्या कार्यकर्त्यांना या संघटनेत जिल्हा कार्यकारणी, तालुका कार्यकारणी, गाव पातळीवर शाखा व त्याचे अध्यक्ष व कार्यकारणीवरती काम करावयाचे असेल त्यांनी ९८९०९ ८८०१४ वरती संपर्क करावा.
अनेक वर्षे
दलित पँथर या संघटनेत मा.अंबादास शिंदे सर यांनी काम करून चळवळीसाठी योगदान दिले आहे.
एक लढवय्या पँथर नेता म्हणून अंबादास शिंदे सर यांची ओळख आहे. प्रचंड कायद्याचा अभ्यास
ही त्यांची सिदोरी आहे. ते साप्ताहिक बंडखोर वृत्तपत्राचे संपादक पत्रकार मालक आहेत.
ते निर्भिड लिखाण करून जनतेला वाचावयास देतात. दलित पँथर ही संघटना स्थापन करून चळवळ
पुढे नेण्यासाठी झटत आहेत त्यांना आपण सर्वांनी बळ द्यावे. दलित पँथर संघटनेची नव्याने
स्थापना केल्याबद्दल सर आपले अभिनंदन वं पुढील संघटनेच्या बांधणीसाठी शुभेच्छा...!
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१