उपसंपादक: साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवार,आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत,शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या वतीने आलेल्या प्रत्येक आधार कार्डाला ५ किलो सवलतीत ६० रुपये प्रमाणे हरभरा डाळ वाटपाच्या उपक्रमाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
त्याचबरोबर संवेदनशील मुख्यमंत्री यांनी शासन आपल्या दारी योजना आणून सर्वसामान्यांना एक वेगळा पायंडा पाडला त्याच धर्तीवर दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर नारीशक्तीचा सन्मान म्हणून माता-भगिनींसाठी शिवसेनेच्या वतीने जणू मुख्यमंत्र्यांच्या कार्याची प्रचितीच आणून दिली.
शिवसेनेच्या वतीने सवलतीच्या दरातील डाळ आज माळशिरस मध्ये अहिल्यादेवी निवास येथे नगरपंचायत हद्द व इतर आसपासची गाव यांना वितरित करण्यात आली. यावेळी डाळीसाठी महिला व नागरिकांची झुंबड उडाली होती. डाळीसाठी लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
शिवसेनेनी सलवलितीच्या दरात हरभरा डाळ वाटप करून खूप मोठे कार्य केले आहे.यंदाची आमची दिवाळी गोड होणार आहे. त्यांच्या कार्याला मन:पूर्वक शुभेच्छा.
मंगल पवार (गृहिणी)
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१