संपादक साप्ताहिक बहुजन भूषण वृत्तपत्र
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, तो हक्क व अधिकार आहे त्यासाठी मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील ऊन,
वारा, रात्र, कुटुंब
याचा विचार न करता रात्रंदिवस मराठा समजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी लढा,
संघर्ष, उभारला आहे. मराठा एकसंघ करण्यात मनोज
जरांगे पाटील यशस्वी झाले आहेत व त्यांच्या पाठीशी खंबीर असा मराठा समाज उभा आहे.
मराठा समाजाला एकसंघ, एकजूट करण्यासाठी आदर्श कामगिरी ठरली
आहे. शांत, संयमी, अभ्यासु असे त्यांचे
गुण आहेत. समाजाची वेदना हिच खरी तळमळ समजून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे म्हणून
जीवाची पर्वा न करता समाजासाठी झटत आहेत. समाजासाठी एक "दिलदार बांधव" म्हणून नाव
झाले आहे.
“साधी राहणी,
उच्च विचार सरणी” असे आहेत. रणांगणात
लढून समाजाच्या हितासाठी आरक्षण मिळावे म्हणून संघर्ष करीत आहेत.
मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी लढा उभारला आहे. या आंदोलनाची
महाराष्ट्र सरकारने धास्ती घेतली आहे, सरकारला घाम फोडला आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असे बहुजन राष्ट्रशक्ती सामाजिक संघटनेचे
संस्थापक, संपादक, पत्रकार श्री.अभिमन्यू
आठवले यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी एक
हिरा लाभला आहे. "ना आमदार, ना खासदार,
ना मंत्री", ना विविध
संस्था त्याचे चेअरमन असे काहीही नसताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून धडपड
करीत आहेत. समाजाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून झटत आहेत त्यांचा त्याग समाजासाठी
अति महत्वाचा आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा "सेनापती"
समाजाला मिळाला आहे हे समाजासाठी महत्वाचे आहे. या अगोदर मराठा समाजाने ५८ शांत
मोर्चे काढले, आंदोलने केली ती आदर्शवादी ठरली. मराठा
बांधवाची वेदना, तळमळ याचा विचार करून सरकारने आरक्षण द्यावे
हिच अपेक्षा.
बातमी
अधिक जाहिरातीसाठी संपर्क
संपादक : मा. श्री. डॉ. अभिमन्यु बी. आठवले
९४२०३०२५६१